आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकू भूक लागली म्हणून घरात घुसला; 16 वर्षीय मुलाने केले बॅट, चाकू व कात्रीने असंख्य वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या प्रकरणी संबंधित मुलाला अटक करण्यात आली आहे. - Divya Marathi
या प्रकरणी संबंधित मुलाला अटक करण्यात आली आहे.
मुंबई - येथील धारावी परिसरात राहणारा कमलेश आपल्या फ्लॅटमध्ये परतला तेव्हा त्याची 70 वर्षीय आई रक्तात भिजलेल्या अवस्थेत तडपत होती. तिला गंभीर अवस्थेत रुगणालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या 16 वर्षीय हल्लेखोराला अटक केली आहे. एका ज्वेलरचा मुलगा असलेला हल्लेखोर त्याच इमारतीमध्ये राहत होता. हल्ला करणारा मुलगा नेहमीच फ्लॅटमध्ये ये-जा करत होता. घटनेच्या दिवशी तो महिलेला भूक लागली म्हणून घरात घुसला होता. 
 

बॅट, कात्रीने केले वार...
- मुंबईच्या धारावी परिसरात राहणाऱ्या कमलेश कामावर गेला असताना त्याची 70 वर्षीय आई सरिता बेन घरात एकटीच होती. त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाने आपल्याला भूक लागल्याचे सांगत घरात प्रवेश केला. 
- सरिता किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेल्या असताना संबंधित मुलाने चक्क अलमारीतून दागिणे आणि पैसे काढण्यास सुरुवात केली. 
- सरिता यांनी हे दृश्य पाहताच त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावर चिडलेल्या आरोपी मुलाने अचानक महिलेवर हल्ला केला. 
- सर्वप्रथम त्याने कपडे धुण्याची बॅट उचलून तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात महिलेचा मृत्यू झालेला नसल्याचे पाहता त्याने जवळची कात्री उचलली आणि बेछूट वार करायला लागला.
- एवढ्यातही तो थांबला नाही. महिलेचे तोंड बळजबरी उघडून त्याने डिटर्जेंट पाजण्याचा प्रयत्न केला. 
 
 
पैश्यांच्या लालसेपोटी केली गुन्हेगारी
- घटना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास केला असताना आरोपी हा चौथ्या फ्लोरवर राहणारा 16 वर्षीय मुलगा असल्याचे लक्षात आले. 
- 17 ऑगस्टच्या रात्री तो महिलेच्या घरात आला होता. नेहमीच घरात ये-जा करत असल्याने महिलेला त्याच्यावर संशय आला नाही. या प्रकरणी संबंधित अल्पवयीनाला अटक करण्यात आली आहे. 
- पोलिसांसमक्ष त्याने हे कृत्य पैश्यांसाठी केल्याची कबुली दिली आहे. तो एका ज्वेलरचा मुलगा आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 
- पीडित महिलेच्या मुलाने लावलेल्या आरोपानुसार, संबंधित हल्लेखोराचे पालक आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात होते. त्याने पालकांवर सुद्धा कारवाईची मागणी केली. दरम्यान, सरिता यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांना 17 टाके लागले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...