आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या निसर्गरम्य हिल स्टेशनने साजरा केला 164 वा वाढदिवस, पाहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व निसर्गरम्य हिल स्टेशन माथेरानला 164 वर्षे पूर्ण झाली आहेत. माथेरानच्या वाढदिवसानिमित्त येथील युवकांनी पाच किलोचा केक कापून आनंद साजरा केला. या दरम्यान माथेरान फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा 21 ते 26 मे दरम्यान माथेरान महोत्सवाचे आयोजन केले आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या माथेरानला सरकारने संवेदनशील व हेरिटेजचा दिला आहे. त्यामुळेच तेथे काहीही नवीन बांधकाम करता येत नाही व जुने पाडता येत नाही. ब्रिटिशांनी बनवलेल्या या निसर्गरम्य हिल स्टेशनला लाखो पर्यटक भेट देतात. ब्रिटिशांनी भारताला दिलेली ही भेटच मानली पाहिजे.
माथेरानचा वाढदिवस गीतकार आणि कवी अरूण म्हात्रे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यानंतर म्हात्रे यांच्यासमवेत हजारो पर्यटकांनी एक गाणे गायले. येथील स्थानिक लोकांनीच माथेरानचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. माथेरानमुळे त्यांना व्यवसाय मिळाला आहे. त्यामुळे ते माथेरानबाबत आस्था बाळगून आहेत. म्हणूनच ते निसर्गाचे जेवढे आभार मानतात तेवढेच ब्रिटिशांचेही मानतात.
मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर वसलेले हे छोटेसे हिल स्टेशन मुंबईसह पुणेकरांचे आकर्षणकेंद्र आहे. इथे आल्यावर तुम्हाला निसर्गाच्या कवेत आल्यासारखे वाटेल. शांत परिसरासोबतच उंचीवर असलेली झाडे तुम्हाला एक अलगद हवा वा-याची झुळूक देतात. माथेरानमधील झाडे इतकी सुंदर आहेत की तुम्हाला तेथेच कायमचे घर करून राहावेसे वाटते. कर्जतपर्यंत रेल्वेने प्रवास करून तुम्ही तेथून माथेरान रेल्वेने व टॅक्सीने उंच हिल स्टेशनवर जाऊ शकता. वीकेंड साजरा करण्यासाठी माथेरानसारखे ठिकाण तुम्हाला शोधून सापडणार नाही. 1850 मध्ये ब्रिटिश व ठाण्याच्या कलेक्टरने हिल स्टेशन बनविले होते.
पुढे पाहा या महोत्सवाची छायाचित्रे...