आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७ वर्षीय पृथ्वी शॉने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- मुंबईचा १७ वर्षीय फलंदाज पृथ्वी शॉने गुरुवारी आपल्या पहिल्या रणजी सामन्यात शतक (१२०) ठोकून महान खेळाडू सचिन तेंडुलकरने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. पृथ्वी शॉला सध्या मुंबई क्रिकेट जगतात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे प्रतिभावंत मानले जात आहे. तामिळनाडूविरुद्ध रणजी करंडकाच्या सेमीफायनल सामन्यासाठी त्याची मुंबई संघात निवड झाली. पृथ्वीने शतक ठोकल्याने मुंबईने गुरुवारी तामिळनाडूला ६ विकेटने पराभूत करून रणजी फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये मुंबईसमोर गुजरातचे आव्हान असेल. रणजी फायनल १० ते १४ जानेवारी या काळात इंदुरात होईल.   सचिन तेंडुलकरनेसुद्धा १० डिसेंबर १९८८ रोजी १०० धावा काढून रणजी पर्दापणाचा विक्रम केला होता.

९९ धावांवर झाला होता बाद... 
या शतकाच्या वेळी पृथ्वीला नशिबानेसुद्धा साथ दिली. ९९ धावांवर असताना विजय शंकरच्या चेंडूवर त्याने शॉर्ट थर्ड मॅनवर झेल दिला. मात्र, पंचांनी हा चेंडू नोबॉल ठरवला. यानंतर पृथ्वीने शतक ठोकले. पदार्पणात शतक ठोकून पृथ्वीने सचिन, राहणेसारख्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले. 
बातम्या आणखी आहेत...