आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 18 Crores Loot: Govt Order To Enquiry Of PWD Ex Chief Secretory Shamalkumar Mukherjee

नोकरीच्या आमिषाने 18 कोटींना फसवणा-या PWDच्या अधिका-यांची चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
PWD मंत्री चंद्रकांत पाटील - Divya Marathi
PWD मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई- सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी देतो म्हणून प्रत्येकी 15 लाख रूपये घेऊन 120 तरूणांची सुमारे 18 कोटींची फसवणूक करून लूट करणा-या अधिका-यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, हे प्रकरण पुढे आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिका-यांची चौकशीचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी प्रधानसचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी त्यांच्या सहका-यांच्या मदतीने हे पैसे घेतल्याचा आरोप आहे. मुखर्जी यांच्यासोबत PWD विभागाचे सध्याचे सचिव सचिव देगाटे यांचीही चौकशी होणार आहे. नाशिकचे मुख्य अभियंता केडगे हे चौकशी करणार असून 15 दिवसात आपला अहवाल राज्य सरकारकडे देणार आहेत. चौकशीत संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. तसेच फसवले गेलेल्या सर्व 120 तरुणांनी पोलिसांत तक्रार करावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
नाशिकमधील मालेगाव शहर तसेच परिसरातील 120 तरूणांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेब मॅनेजमेंट कंपनीमध्ये 2011 मध्ये या तरूणांना नियुक्त करण्यात आले होते. नोकरी दिलेल्या सर्व तरूणांना 12 ते 45 हजार रुपयापर्यंत पगार मिळत होता. मात्र मे 2015 पासून पगार बंद झाला. याबाबत मंत्रालय व इतरत्र माहिती घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरूणांच्या लक्षात आले. संबंधित फसवणूक PWDचे मुख्य सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांच्या मध्यस्तीने बोगस नोक-या निर्माण करणारे रॅकेट असल्याचे फसवणूक झालेल्या एका तरूणाने सांगितले. सरकारी नोकरी मिळत असल्याने तरूणांनी व त्यांच्या पालकांनी शेती, घरे विकून पैसे दिले होते. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणांना धक्का बसला. यानंतर त्यांनी धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांच्याशी संपर्क साधला. भामरे यांनी काही तरूणांना मुंबईत मंत्रालयात चौकशी केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाने वरील तरूणांच्या नियुक्त्याच केल्या नसल्याचे स्पष्ट झाले.
सीआयडी चौकशी करा- भामरे
धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी सीआयडी चौकशी करावी अशी केली आहे. राज्य सरकारच्या एका विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी ठरवून ही फसवणूक केल्याने हे प्रकरण अतिशय गंभीर असून तरूणांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका भामरे यांनी घेतली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या भूषण शेवाळे या तरूणाने पैसे मिळाले नाही तर मुखर्जी यांच्या घरी जाऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.

काय आहे प्रकरण?-
- सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मुखर्जी यांनी तत्कालीन (आता निवृत्त) मुख्य अभियंता सुभाष पंचगले व उपअधिक्षक वानखेडे यांना हाताशी धरून 120 तरूणांकडून प्रत्येकी 15 लाख रूपये घेतले.
- सार्वजनिक बांधकाम विभागातील एम. एन. डेकाटे यांच्या सहीनिशी तरूणांना नियुक्ती पत्र देण्यात आली. तरूणांना पॅन कार्ड, फॉर्म 16, पगाराची स्लिप दिली जात होती.
- डेकाटे हे सध्या पोलिस गृहनिर्माण विभागात कार्यरत असून, तत्कालिन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात ते काम कार्यरत होते.
- नाशिकमधील मालेगाव कोर्टाजवळ मालेगाव हब कॉम्पेक्स नावाने सार्वजनिक बांधकाम विभाग वेब मॅनेजमेंटचे कार्यालय स्थापन करण्यात आले. 2014च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम या तरूणांना दिले होते. मात्र हे काम खासगी पद्धतीने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- राज्य सरकारमधील महत्त्वाच्या एका विभागातील अधिकारी व कर्मचारी यात अडकल्याने सरकारने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.