आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 18 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील 18 सनदी अधिकार्‍यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी 15 फेब्रुवारीपर्यंत बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुढील चार दिवसांत आणखी काही बदल्या होण्याची शक्यता आहे. ठाण्याचे सहायक जिल्हाधिकारी शैलेश नवल यांना अहमदनगरच्या सीईओपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांची नाशिक विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डवले यांच्या जागी मुंबई अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक ए. टी. कुंभार यांना पाठवण्यात आले. तर नागपूरचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पुणे जिल्हाधिकारीपदावर नियुक्त करण्यात आले आहे. पुण्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक शुल्क नियंत्रक एस. चोकलिंगम यांना शिक्षण आयुक्तपदी पाठवण्यात आले आहे, तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम.कवडे यांना नंदूरबार जिल्हाधिकारपदी नियुक्त करण्यात आले आहे.
यवतमाळच्या सहाय्यक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना यवतमाळच्या सीईओ म्हणून पाठवण्यात आले आहे. गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना वध्र्याचे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चंद्रपूरच्या सीईओ संपदा मेहता यांना गडचिरोलीच्या सीईओपदी पाठवण्यात आले असून मंत्रालयातील उपसचिव मल्लिकानाथ कलशेट्टी यांना मेहता यांच्या जागेवर पाठवण्यात आले आहे. गोंदियाचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रातून परतलेले अनुपकुमार यांची नागपूरच्या विभागीय आयुक्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्याजागी असलेले वेणुगोपाल रेड्डी यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली असून त्या जागी असलेले संजय देशमुख हे म्हैसकर यांच्या जागेवर आले आहेत.