आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हीजेटीअाय’ विद्यार्थ्यांचा सलग अठरा तास अभ्यास; डाॅ. अांबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘एरवी पाच तास पण अभ्यासाला बसवत नाही. पण रविवार सुटीचा दिवस असूनही अभ्यासाची नवी ऊर्मी मिळाल्यासारखे वाटत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून दहा तास झाले पण कंटाळा आला नाही’, या भावना अाहेत व्हीजेटीअाय संस्थेतील अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या देवर्षी येंडे याचे. निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  जयंतीनिमित्त या महाविद्यालयात राबवण्यात येत असलेल्या सलग १८ तास अभ्यास उपक्रमाचे.   

डॉ. आंबेडकर १९०७ ते १९१२ या कालावधीत कोलंबिया विद्यापीठात शिकत हाेते. येथील अभ्यासाचे  वातावरण बघून त्यांनीही सलग अठरा बसून अभ्यास  केला. पीएचडीची पदवी िमळवायला  सात ते अाठ वर्षे लागतात. परंतु बाबासाहेबांनी अवघ्या तीन वर्षांत एमएसस्सी अाणि पीएचडी या दाेन्ही पदव्या संपादन केल्या.  सलग अठरा तास  अभ्यास करणे सहज शक्य नाही. असा अभ्यास करताना बाबासाहेबांनादेखील अनेक अडचणींना सामोर जावे लागले हाेते. या  सगळ्या गाेष्टींची प्रचिती अाजच्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात अाल्याचे ‘व्हीजेटीअाय’चे ग्रंथालय प्रमुख प्राध्यापक अभय बांबाेळे यांनी सांिगतले.   

२५० विद्यार्थ्यांचा सहभाग
रविवारी सकाळी सहा वाजताच विद्यार्थी  महाविद्यालयात अाले. पन्नास विद्यार्थी येतील असे वाटत असताना प्रत्यक्षात अडीचशे विद्यार्थ्यांची नाेंदणी झाली. ‘व्हीजेटीअाय’चे प्राध्यापक वाल्मीक िनकम यांच्या संकल्पेनूत  सलग १८ तास अभ्यास उपक्रमाची िनर्मिती झाली. त्यानुसार संचालक अाेमप्रकाश काकडे यांच्याबराेबर चर्चा झाल्यानंतर वेबसाइटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात अाली. विशेष म्हणजे केवळ २४ तासांच्या अात २५० विद्यार्थ्यांची नाेंदणी झाली. यात ६८ विद्यार्थिनींचा समावेश हाेता. या सर्वांच्या  तीन वेळा नाश्ता अािण दाेनवेळा जेवणाची व्यवस्था करण्यात अाली हाेती.
बातम्या आणखी आहेत...