आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनच्या नादात आईचा धक्का लागला अन् 18 महिन्यांची मुलगी इमारतीवरून कोसळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई- इमारतीच्या १०व्या मजल्यावर उभ्या महिलेच्या हातातून माेबाइल निसटला, ताे पकडण्याच्या नादात खिडकीत उभ्या असलेल्या तिच्या १८ महिन्यांच्या मुलीला धक्का लागून ती खाली पडली. यात मुलीचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री मुंबईच्या अंधेरी (पूर्व) परिसरात ही घटना घडली.

रिहाब कानाकीय इमारतीत यादव कुटुंब आपल्या २ मुलींसह राहते. आरती यादव (२७) गुरुवारी सायंकाळी ७ वाजता इमारतीच्या १० व्या मजल्याच्या जिन्यात आपल्या छोट्या मुलीस घेऊन उभ्या होत्या. जिन्याला दीड फूट खिडकी असून त्या खिडकीला खालच्या बाजूने दोन राॅडही लावलेले आहेत. आरती यांनी छोट्या अनुला खिडकीजवळ उभे केले होते. 

अनुने आपल्या लहानग्या हातांनी राॅड पकडलेला होता. आरतीनेही अनुला घट्ट पकडलेले होते. तेवढ्यात आरतीच्या हातातून तिचा मोबाइल सटकला. ताे पकडण्यासाठी अारती झटकन  खाली वाकली. त्याच वेळी खिडकीत उभ्या चिमुकल्या अनुला आरतीचा धक्का लागला व ती खिडकीतून बाहेर फेकली गेली. काही कळायच्या आत ती खाली रस्त्यावर पडली. अनुला लगेच शेजारच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी ती मृत पावल्याचे घोषित केले. 
बातम्या आणखी आहेत...