आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदी बोहरा समाज धर्मगुरूंच्या अंत्यदर्शनावेळी मुंबईत चेंगराचेंगरी; 18 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुस्लिम धर्मातील दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरु डॉ. सय्यदना मोहम्मद बु-हानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो अनुयायांनी काल रात्री अडीचच्या सुमारास मोठी गर्दी केल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जण ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील चर्नी रोडवरील सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
डॉ. सय्यदन बु-हानुद्दीन यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशभरातून बोहरी समाजाच्या नागरिकांनी मुंबईकडे धाव घेतली. काल सायंकाळी व रात्री उशिरा सर्व लोक पोहोचत होते. रात्री दोन-अडीचच्या सुमारास लाखो लोक जमा झाले. त्यावेळी सय्यदना यांचा मृतदेह त्यांच्या घरातच होता. मात्र, लाखो लोकांना सामावून घेईल एवढी जागा तेथे नव्हती. त्यामुळे सय्यदना यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्यानंतर लगेच चेंगरा-चेंगरी सुरु झाली. जागा अपुरी असल्याने व लाखो लोक दर्शनासाठी आले असल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढे वाचा, डॉ. सय्यदना बु-हानुद्दीन यांच्याविषयी...