आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चीनच्या पाचदिवसीय भेटीवर रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर, अकोला, यवतमाळ, भंडारा, वर्धा, रायगड अशा नऊ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
अल्पबचत आणि लॉटरीचे आयुक्त अमिताभ जोशी यांची राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी, तर परिवहन आयुक्त महेश झगडे यांची पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. भूगर्भ सर्वेक्षण विकास यंत्रणेचे (जीएसडीए) संचालक रूपिंदर सिंग यांची पुण्यातील महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकर (मेडा)चे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
परभणीचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सध्या यवतमाळचे जिल्हाधिकारी असलेले राहुल रंजन महिवाल यांना परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एस.एम. काकानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धीरज कुमार यांना भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून राज्य सरकारच्या वनामती प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सचिन कुर्वे यांना नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. वर्धा जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांची नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी निरूपमा डांगे यांची अाल्या अाहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. काकानी यांच्या जागी अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले अरुण डांगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेत एन. के. पाटील यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

विक्रमकुमार मुंबईत
अौरंगाबादचेजिल्हाधिकारी विक्रम कुमार यांची मुंबईतील एमआयडीसी मुख्यालयात सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात अाली असून त्यांच्या जागी वीरेंद्र सिंग यांची जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. वीरेंद्र सिंग हे सध्या मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून काम करत होते.
बातम्या आणखी आहेत...