आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील 19 साखर कारखाने बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात असून 31 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. यात औरंगाबाद आणि नांदेड विभागातील सर्वाधिक म्हणजे 19 कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 598.31 लाख टन गाळप संपले असून 66.92 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. येत्या पंधरवड्यात सर्व कारखान्यांचा हंगाम संपलेला असेल, असे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

यंदा 108 सहकारी आणि 60 खासगी कारखान्यांनी गाळप केले. दोन वर्षातील कमी पावसामुळे ऊस उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने गाळपाचे आकडे घसरले आहेत. चार वर्षांच्या तुलनेत यंदाचे गाळप आणि साखर उत्पादन सर्वात कमी आहे. साखर उत्पादनात पुणे विभाग अव्वल ठरला. या विभागातील 54 कारखान्यांनी 231.48 लाख टन गाळप करीत 25.59 लाख टन साखर उत्पादन केले, तर उता-याच्या बाबतीत कोल्हापूर विभाग राज्यात अव्वल ठरला. या विभागातील सरासरी साखर उतारा 12.30 टक्के आहे.