आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरूने 19 वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून बाहेर फेकले, पैसे न दिल्याने केले हे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोमल चव्हाण... - Divya Marathi
कोमल चव्हाण...
मुंबई- धावत्या लोकलमधून एका माथेफिरूने 19 वर्षीय तरुणीला बाहेर फेकल्याची घटना विरार येथे शुक्रवारी उघडकीस आली. कोमल संतोष चव्हाण असे तरुणीचे नाव असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
कोमल नालासोपारा पश्चिम समेळपाडा भागात राहते. गुरुवारी रात्री कोमल ही नालासोपाऱ्याहून घरी जात होती. ती महिलांच्या डब्यात बसली मात्र या डब्यात इतर कोणीही नव्हते. त्याच वेळी माथेफिरू हा महिलांच्या डब्यात चढला. त्यानंतर त्याने कोमलकडे पैश्यांची मागणी केली. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने तिला लोकलखाली फेकून दिले.
 
घटनेनंतर रेल्वेस्थानकावरील काही प्रवाशांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून त्यानुसार पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.... संबंधित घटनेचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...