आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या लोकलमधून तरुणीला फेकले; मोबाइल, पर्स व कानातील रिंगाही हिसकावल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धावत्या लोकलमधून 19 वर्षीय तरुणीला फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने तिचा मोबाइल, पर्स आणि कानातील रिंगाही हिसकावल्या आणि तिला लोकलमधून फेकले. शनिवार (ता.2) रात्री साडे अकरा वाजता हार्बर मार्गावरच्या नेरूळ-जुईनगर दरम्यानची ही घटना आहे. या घटनेवरून मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणार्‍या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

 

ऋतूजा बोडके असे या तरुणीचे नाव असून ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर वाशीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, ऋतुजा महिलांच्या डब्यातून प्रवास करत होती. रात्री 11 वाजेच्या सुमारास एक चोरटा तिच्याजवळ आला आणि तिचा मोबाइल, पर्स आणि तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा त्याने हिसकावल्या. इतकचे नाही तर तिला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले. ट्रेन जुईनगर रेल्वे स्थानकात प्रवेश करत होती. त्यामुळे ट्रेनचा वेग कमी होता. या घटनेत ऋतूजाला गंभीर दुखापत झाली झाली. पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...