आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 1993 Blast Accused Mustafa Dossa Holds Modelling Audition Inside Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गँगस्टरने कोर्ट रुममध्ये सुनावणीवेळी मॉडेल बोलावून घेतली ऑडिशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी गँगस्टर मुस्तफा दोसा याने कोर्ट रुममध्ये सुनावणी दरम्यान मॉडेल्सला बालावून त्यांची ऑडिशन घेतल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. दोसावर आरोप आहे, की त्याने दुबईतील ज्वेलरी दुकानांच्या असाइनमेंटसाठी कोर्ट रुममध्ये आठ मॉडेल्सला बोलावले आणि त्यातील एकीची निवड केली.
पोलिसांच्या माहितीनूसार ही घटना या महिन्याच्या सुरुवातीची आहे. ऑडिशनसाठी आलेल्या एका 19 वर्षीय मॉडेलने दोसाविरोधात एफआयआर दिला आहे. मॉडेलचा दावा आहे, की आठ पैकी तीन जणींची निवड करण्यात आली होती. त्या तिघींमध्ये हिचा समावेश होता. तिला एक लाख रुपये टोकन अमाउंट देण्यात आला होता. मात्र, मॉडेलचा आरोप आहे, की दोसाच्या सहकाऱ्यांनी दोन लोकांच्या मदतीने ती रक्कम आणि मोबाइल हिसकावून घेतला. ते दोन जण पोलिसांच्या वेशात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
मुंबई बॉम्बस्फोटात तीन आरोपी
मुंबईमध्ये मार्च 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यात 257 निरपराधांचा जीव गेला होता, तर 32 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर, टायगर मेमन आणि मुस्तफा दोसा मुख्य आरोपी होते. दोसाला 2003 मध्ये अटक करण्यात आली होती.
तुरुंगात 'गॉडफादर' सारखा राहातो
दाऊद इब्राहिमचा अतिशय जवळचा म्हणून मुस्तफा दोसा परिचीत आहे. त्याने अर्थर रोड तुरुंगात अबू सालेमवर हल्ला केला होता. तुरुंगात त्याची चांगलीच चलती आहे. तेथील कैद्यांचा तो गॉडफादर समजला जातो. तो त्यांना पैशांपासून कायदेशीर मदत करतो. दोसा धनवान गँगस्टर असल्याचे मानले जाते. त्याचे मुंबईतील मनीष मार्केट, हीरा पन्ना आणि मुसाफिरखाना येथे अनेक दुकाने आहेत. त्याची पत्नी आणि दोन मुले दुबईत सोने आणि इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करतात. आर्थर रोड सूत्रांच्या माहितीनूसार, 2004 मध्ये त्याने तुरुंगात शीर-खुरमा खाण्याची विनंती कोर्टाकडे केली होती, आणि ती मंजूर झाली होती. कोर्टाने फक्त त्यालाच शीर-खुरमा द्या असा आदेशात उल्लेख केला नव्हता. त्याने तुरुंगातील कैदी आणि अधिकाऱ्यांनाही शीर-खुरमा खाऊ घातला होता.