आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण; तब्बल 24 वर्षांनी एका आरोपीला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीला तब्बल 24 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. कादीर अहमद असे आरोपीचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली. 

टाडाअंतर्गत अहमद हा आरोपी आहे. बॉम्बस्फोटासाठी टायगर मेमनने पाठवलेली शस्त्रास्त्रे व स्फोटके गुजरातमधील जामनगर येथे उतरविण्यास मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि गुजरात पोलिस सध्या कादीरची चौकशी करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...