आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील सूत्रधार मुस्तफा डोसा याचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील सूत्रधारांपैकी एक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू मुस्तफा डोसाचा बुधवारी जे. जे. रुग्णालयात हृदयगती बंद पडून मृत्यू झाला. विशेष टाडा न्यायालयाने त्याला याच महिन्यात दोषी ठरवले होते.  60 वर्षीय डोसाच्या छातीत वेदना होत असल्याने बुधवारी भल्या पहाटे त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते, असे पोलिसांनी सांगितले. डोसाला पहाटे 3 वाजता रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या छातीत दुखत होते. त्याला अनियंत्रित हायपरटेन्शन, मधुमेह व संक्रमणही होते.

डोसाला फाशी देण्याची मागणी
- विशेष सरकारी वकिलांनी मंगळवारी सुनावणी दरम्यान कोर्टात डोसा याला फाशी देण्याची मागणी केली होती.
- 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 24 वर्षानंतर 16 जून रोजी विशेष टाडा कोर्टाने गॅगस्टर अबु सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवले होते. पुराव्यांअभावी एका आरोपीची मुक्तता करण्यात आली होती.
- दोषींना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. सालेमला प्रर्त्यापण करुन भारतात आणण्यात आले होते. या प्रर्त्यापण करारानुसार त्याला फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा सुनावता येणार नाही.
- मुंबई साखळी बॉम्बस्फोट हे 12 मार्च 1993 रोजी झाले होते. या बॉम्बस्फोटामध्ये 267 जणांचा मृत्यू झाला होता व 713 जण जखमी झाले होते. 27 कोटी रुपयांच्या संपत्तीचे त्यामुळे नुकसान झाले होते.  
 
मुंबई साखळी बॉम्बस्फोटात काय होती भूमिका
- बॉम्बस्फोटांसाठी हत्यारे आणि विस्फोटके मागविण्याचा मास्टरमाइंड अशी त्याची ओळख होती. रायगड जिल्ह्यात हत्यारे उतरविण्यासाठी आणि आरोपींना पाकिस्तानात ट्रेनिगसाठी पाठविण्यासाठी आणि कट रचण्यासाठी त्याला दोषी ठरविण्यात आले होते. 
बातम्या आणखी आहेत...