आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडीच कोटींच्या दागिन्यांची अंतर्वस्त्रातून तस्करी, सियाराम कंपनीच्या संचालक पत्नीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कापड उद्योगात बडे प्रस्थ समजल्या जाणा-या सियाराम सिल्क मिल्सचे संचालक अभिषेक पोद्दार यांच्या पत्नी विहारी शेठ यांनी अंतर्वस्त्रातून अडीच कोटींच्या दागिन्यांची तस्करी केल्याप्रकरणी त्यांना नुकतीच अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


महसूल संचालनालयाच्या (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) अधिका-यांना विहारी दागिन्यांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अंतर्वस्त्रात अडीच कोटी रुपयांचे दागिने आढळून आले. चौकशीदरम्यान दहा वेळा महागड्या दागिन्यांची तस्करी केल्याचे त्यांनी कबूल केले. विहारी यांचे सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विहारी ज्वेल्स नावाचे महागड्या दागिन्यांचे दुकान आहे. त्यांनी माहिती देताच महसूल संचालनालयाच्या अधिका-यांनी त्यांच्या दुकानाला सील लावले असून सर्व व्यवहार तपासण्यास सुरुवात केली आहे. दुकानात आतापर्यंत चार कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. विदेशातून आणलेल्या या दागिन्यांची भारतात अधिकृत नोंद नाही. या दागिन्यांवर लागू असलेला कर भरण्यात आलेला नाही., असे प्राथमिक तपासात आढळल्यामुळेच कारवाई करण्यात आल्याची माहिती महसूल संचालनालयाने दिली.