आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानांतील शौचालयांत २.५९ कोटींचे सोने जप्त, प्रवाशाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक छायाचित्र. - Divya Marathi
प्रतिकात्मक छायाचित्र.
मुंबई/ मंगळूर - मुंबई आणि मंगळूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी २.५९ कोटी रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. विमानाच्या शौचालयात ते लपवण्यात आले होते. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिका-यांनी जेट एअरवेजच्या मस्कत-मुंबई विमानाच्या मागच्या बाजूच्या दोन शौचालयांत १.९९ कोटींच्या एक- एक किलो वजनाच्या आठ विटा होत्या. सेगू नैना मोहंमद या प्रवाशाला अटक झाली आहे.
कोलकात्यात तो हे सोने उतरवून घेणार होता. दुसरीकडे दुबईहून मंगळूरला पोहचलेल्या विमानातून महसूल दक्षता अधिका-यांनी एका परदेशी प्रवाशाकडून ६० लाख रुपये किमतीच्या सोन्याची २२ बिस्किटे जप्त केली. ही बिस्किटेही विमानाच्या मागच्या शौचालयात
लपवण्यात आली होती. यापू्र्वी ६ मार्च रोजी मुंबई विमानतळावरच ७०.५८ लाख किमतीचे २.८ किलो सोने जप्त करण्यात आले होते.