आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर 2 सख्ख्या भावांकडून बलात्कार; रॉकेल ओतून जिवंत पेटवून देण्याचाही प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भिवंडी शहरात एका अल्पवयीन मुलीवर दोन सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोनू शहा आणि अस्लम शहा अशी या दोन्ही नराधमांची नावे आहेत.

आरोपी मोनू याने 15 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला नेले. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेची समजूत काढण्यासाठी निकाह केल्याचा बनाव करून मोनूने तिला घरी आणले. त्यानंतर पीडितेवर तिचा मोठा दीर अस्लम यानेही बळजबरीने बलात्कार केला. हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी बेदम मारहाण करून अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत पेटवून देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून वाचा काय आहे हे प्रकरण?
बातम्या आणखी आहेत...