आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Businessmen Incited Men Suspected To Have Joined ISIS In Iraq

मुंबईच्या त्या 'बेपत्ता' युवकांना इराकला पाठवण्यासाठी दोन व्यापा-यांनी केली मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठाण्याचे चार तरुण ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याच्या बातमीनंतर आता पोलिसांनीही हे लोक इराकला गेले असल्याचा संशय आहे. तसेच पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व युवक दोन व्यापा-यांच्या संपर्कात होते. त्यांनीच या सर्वांना इराकला जाण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणांना भेटणा-या दोन्ही व्यापा-यांची ओळख पटवण्यात आली आहे. एटीएसच्या एका अधिका-याच्या मते या प्रकरणात प्राथमिक तपासणीत अनेक पुरावे हाती आले आहेत. या तरुणांची इराकला जाण्यची व्यवस्था कोणी केली होती, याचा तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिस सतर्क
मुंबईच्या भिवंडी आणि आस-पासच्या परिसरातील सुमारे 15 जण बेपत्ता आहेत. त्यात धार्मिक यात्रेला गेलेल्या आरिफ, अमन, सलीम आणि फहद यांचाही समावेश होता. या चौघांनी एकाचवेळी घर सोडले होते. पण अद्याप ते घरी परतलेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी हे सर्व बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी एकाचे बगदादला पोहोचल्यानंतर नातेवाईकांबरोबर फोनवर बोलणेही झाले होते. तर दुसरीकडे गुप्तचर संस्था इराकला गेलेल्या 18 तरुणांवर नजर ठेवून आहेत.

ISIS मध्ये सहभागी झाल्याचे वृत्त वडिलांनी फेटाळले
या युवकांपैकी एक असणा-या आरीफच्या वडिलांनी मात्र त्यांचा मुलगा ISIS मध्ये सहभागी झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. मुलगा नोकरीच्या शोधात गेला आहे, पण तो कुठे गेला याबाबत काहीही माहिती नसल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार दिल्याचे ते म्हणाले. मात्र, एका वृत्तपत्राने हे युवक ISIS मध्ये सहभागी झाल्याचे वृत्त दिले होते.
(फाइल फोटो- मुंबईच्या कल्याणमधून बेपत्ता झालेले तीन तरुण)