आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Dead, 3 Injured After Audi Collides With Taxi In Mumbai

मुंबईत मद्यधुंद वकील महिलेच्या \'ऑडी\'ने टॅक्सीला दिली धडक, 2 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील ईस्टर्न फ्री-वेवर काल मध्यरात्री 1 वाजता मद्यपान करून एका वकिल महिलेने ऑडी कारने टॅक्सीला उडवल्याची घटना समोर आली आहे. जान्हवी गडकर (वय 33) असे या वकिल महिलेचे नाव आहे. गडकर या काल मध्यरात्री 120- 130 स्पीडने ईस्टर्न फ्री-वेववरून चालल्या होत्या. मद्यपान जास्त घेतल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गडकर यांच्या ऑडीने टॅक्सीला समोरून जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सलीम सबुनवाला आणि सय्यद हुसैन अशी मृतांची नावे आहेत. जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सलीम सबुनवाला हे मुलगा दहावीला होता. त्याचा निकाल काल दुपारी लागला. दहावीत चांगले गुण मिळाले म्हणून सबुनवाला कुटुंबिय जेवायला बाहेर गेले होते. रात्री घरी परतत असताना जान्हवी गडकर यांच्या ऑडी कार टॅक्सीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यात सलीम व सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला. ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी जान्हवी गडकर दारूच्या नशेत होत्या. 33 वर्षीय जान्हवी गडकर या पेशाने वकिल असून त्या हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. अपघातानंतर पोलिसांनी गडकर यांना ताब्यात घेतले. मात्र, त्यावेळी घटनेचे गांभीर्य न जानता हवे तेवढे पैसे घ्या आणि मला सोडा असे त्या सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गडकर यांनी एवढे मद्यप्राशन केले होते की, अपघात झाल्यानंतर गडकर खाल्या उतरल्या तेव्हा त्यांना चालताही येत नव्हत्या. दारूच्या नशेत त्या रस्त्यावरच पडल्या होत्या, असे सबुनवाला कुटुंबियांनी सांगितले. गडकर यांना पोलिसांनी मद्यप्राशन करून बेजबाबदारपणे वाहन चालविल्याप्रकरणी अटक केली आहे.
पुढे पाहा, ऑडीची कशी झाली अवस्था...