आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत भरधाव इंडिकाने महिलांना उडविले; दोघी जागीच ठार, चार जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंधेरीतील सीप्झ परिसरात आज मॉर्निंग वॉकला जात असलेल्या महिलांना भरधाव इंडिका कारने दिलेल्‍या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्‍यू झाला. तर 4 महिला गंभीर जखमी झाल्‍या आहेत. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

प्राप्‍त माहितीनुसार, माहितीनुसार, सीप्झ परिसरातील गेट नंबर तीनजवळ हा अपघात झाला. इंडिका चालक कार अतिशय वेगात चालवित होता. रस्त्याच्‍या कडेने जात असलेल्या सहा महिलांना इंडिकाने धडक दिली. या अपघातात संगीता वानन आणि रेखा होनाळे या दोन महिलांचा मृत्यू झाला. त्‍यांच्‍या सोबतच्‍या 4 महिलांना नागरिकांनी गंभीर जखमी अवस्‍थेत रुग्‍णालयात दाखल केले. या प्रकरणी आरे कॉलनी पोलिसांनी इंडिकाचा चालक प्रवीणकुमार कनोजिया याला अटक केली आहे. त्याने दारूचे सेवन केले होते की नाही, याची चौकशी करण्यात येत आहे.