आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगडच्या देवकुंड धबधब्याखाली पुण्यातील दोघे बुडाले; एकाचा मृतदेह हाती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र.
मुंबई- रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील देवकुंड येथील धबधब्याखाली पुण्यातील दोन तरुण रविवारी बुडाले. वाहून गेलेल्या दोन तरूणांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. भोसरी येथील 23 वर्षीय अखिल चौधरी आणि पुण्यातील 25 वर्षीय विद्यार्थी नितीन पाठक हे पाण्यात बुडाले आहेत.
 
रिव्हर राफ्टर्सच्या मदतीने शोधकार्य
रविवारी दुपारच्या सुमारास माणगाव तालुक्यातील भिरा येथील कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील धबधब्याच्या परिसरात पर्यटकांनी वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली होती. याचवेळेस पुणे येथून आलेल्या पर्यटकांच्या दोन ग्रुपमधील दोन तरुण हे देवकुंड येथील धबधब्याच्या पाण्यात बुडल्याची घटना घडल्याची माहिती माणगाव पोलीसांना मिळाली.
माणगाव पोलिसांनी तातडीने रिव्हर राफ्टर्सना पाचारण करून घटनास्थळाकडे धाव घेतली होती. त्यानंतर राफ्टर्सच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत या दोन्ही तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आले.  काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी मुंबई येथील 55 विद्यार्थी अडकल्याने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...