आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील कुदळवाडीत 20 दुकाने जळून खाक; भायखळा स्टेशनदरम्यान रेल्वे रूळाला तडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ मुंबई- पुण्यातील कुदळवाडीत येथील भंगार बाजाराला भीषण आग लागून 20 दुकाने जळून खाक झाली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचले आहेत. आग भीषण असल्याने पुणे, देहूरोड, चाकण तसेच शहरातील खासगी कंपन्यांचे अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले आहे. दुसरीकडे भायखळा- चिंचपोकळी स्टेशनदरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील कुदळवाडी येथे रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीने सोमवारी रौद्र रुप धारण केले. भंगार मालाची 20 हून अधिक दुकाने जळून खाक झाली असून अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.  आगीत प्लास्टिक व अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने आग भडकली आणि आजूबाजूच्या दुकानांनीही पेट घेतला.  15 बंब आणि टँकरच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परिसरात धुराचे लोळ पसरले असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, भायखळा-चिंचपोकळी स्टेशनदरम्यान रेल्वे रूळाला तडे

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...