आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकड मृत्यूमुखी पडल्यावर 200 जणांनी केले मुंडण, पैसे जमवून दिले भोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंत्ययात्रेपूर्वी माकडाला आंघोळ घालण्यात आली. - Divya Marathi
अंत्ययात्रेपूर्वी माकडाला आंघोळ घालण्यात आली.
मुंबई/चोपडा- जळगाव जिल्ह्यातील निमगव्हाण या गावात तापी नदीकिनाऱ्यावर राहणाऱ्या एका माकडाचा एका अपघातात मृत्यू झाला. पूर्ण गावाने एकत्र येत माकडावर अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही दशक्रिया विधीसाठी संपूर्ण गावाने एकत्र येत भोजन दिले. 200 गावकऱ्यांनी मुंडण केले.
 
पूर्ण गाव झाले सामिल
- दोन महिन्यापूर्वी एक माकड तापी नदीच्या किनाऱ्यावर येऊन राहू लागले होते.
- लहान मुले आणि गावकरी या माकडाला रोज काहीतरी खाण्यास देत होते. हे माकडही चांगलेच माणसाळले होते.
- 2 ऑगस्ट रोजी एका अपघातात या माकडाचा मृत्यू झाला. माकडाच्या अंत्यविधीत पूर्ण गाव सामील झाले होते.
- दशक्रिया विधीसाठी पूर्ण गावाने पैसे गोळा केले. त्यानंतर भोजन आयोजन करण्यात आले आणि 200 जणांनी मुंडणही केले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...