आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2002 2003 Mumbai Serial Bomblast Case, Life Imprisonment For Main Accused Muzammil.

Mumbai Blast:मुजम्मील अन्सारीला मरेपर्यंत जन्मठेप, पोटा कोर्टाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एखाद्या व्यक्तीला फाशी दिल्यास काही सेकंदांत त्याचे जीवन संपते;╦ पण पीडित किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना जीवनभर मानसिक, भावनिक व शारीरिक यातना भोगाव्या लागतात त्याची त्याला जाणीव होत नाही, असे सांगत विशेष पोटा न्यायमूर्ती पी. आर. देशमुख यांनी मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुजम्मील अन्सारीला शेवटच्या श्वासापर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

विशेष सरकारी वकील अॅड. रोहिणी सालियन यांनी बॉम्ब ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मुझम्मील अन्सारीला फाशीची,साकिब नाचण, गुलाम खोट्टल, फरहान खोत आणि डॉ. वाहिद अन्सारी या चौघांना जन्मठेप सुनावण्याची विनंती त्यांनी न्यायालयास केली. साकीब नाचण आणि त्याच्या साथीदारांनी गोध्रा हत्याकांड आणि बाबरी मशीद विद्ध्वंस या घटनांचा सूड म्हणून मुंबई आणि परिसरात २७ जानेवारी २००३ रोजी सीएसटीहून कर्जतकडे जाणारी लोकल आणि विलेपार्ले मार्केटमध्ये असे दोन बाॅम्बस्फोट केले होते. तर ६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक इमारतीमधील मॅकडाेनाल्ड रेस्टाँरंट मध्ये एक बाॅम्बस्फोट केला होता. या तिन्ही बॉम्बस्फोटात एकूण १३ जण ठार आणि १४१ जण जखमी झाले होते.

कुठे शिजला कट ?
भिवंडी परिसरातील पडघा भागातल्या बोरीवली गावात सिमीचा साकीब नाचणच्या मार्गदर्शनाखाली हा कट रचला गेला. याच परिसरातील बोरिवली, कारवा आणि माहुली गावांशेजारील जंगलात बाॅम्ब बनवले गेले. जंगलात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही दिले गेलेे. आरडीएक्सचा साठाही येथेच दडवून ठेवला गेला होता.
तर बॉम्ब बनवण्याचे साहित्य जमील शेख याच्या दवाखान्यातून जप्त करण्यात आले होते.

आरोपी व शिक्षा
{ मुजम्मील अन्सारी : १८ आरोपांत दोषी. मरेपर्यंत जन्मठेप व लाखाचा दंड
{साकीब नाचण : १० वर्षे सक्तमजुरी व एक लाख रु.दंड
{ अतीक मुल्ला - : १० वर्षे सक्तमजुरी व एक लाख रु. दंड
{ नसीर मुल्ला : १० वर्षे सक्तमजुरी व एक लाख रु. दंड
{ मोहंमद कामील जमील शेख - दोन वर्षे कैद व दोन हजार रु. दंड
{ नूर मोहंमद : दोन वर्षे कैद आणि दोन हजार रु. दंड
{ अन्वर अली : दोन वर्षे कैद व दोन हजार दंड
{ गुलाम अकबर खोट्टल : १० वर्षे कारावास आणि रुपये एक लाख दंड
{ फरहान मलिक : जन्मठेप.
{ वाहिद अन्सारी : पाच गुन्हे सिद्ध, जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड.
मोहम्मद कमील, मोहम्मद अली अन्वर, नूर मोहम्मद यांनाही प्रत्येकी 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. उर्वरित जणांनी अपेक्षेपेक्षा जास्त शिक्षा भोगल्याने जामिनावर त्यांची सुटका करावी असे कोर्टाने सांगितले. याप्रकरणी मुंबईतील विशेष टाडा कोर्टाने मागील आठवड्यात 10 जणांना दोषी ठरवले होते. तर, तिघांना निर्दोष सोडले होते. विलेपार्ले, मुलूंड आणि सेंट्रल रेल्वेमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले होते. यात 12 जणांचा मृत्यू तर 17 जण जखमी झाले होते.
डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या चार महिन्यांच्या काळात मुंबई तीन वेळा बॉम्बस्फोटांनी हादरली होती. मुंबईला हादरवणा-या या स्फोटांमागे स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीचा हात होता. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट घडविल्याचे तपासात समोर आले होते. डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या काळात तीनदा बॉम्बस्फोट घडविले गेले. हा कट गुजरात मुस्लिम रिव्‍हेंज फोर्सने रचला होता.
यातील मुख्य आरोपी नासीर अहमद हा 2003 मध्येच पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला आहे. अदनान बिलाल मुल्ला, नदीम पालवा, हारून रशिद लोहार यांना तिघांना टाडा कोर्टाने निर्दोष ठरवले आहे.
कधी, कुठे घडले होते बॉम्बस्फोट
2 डिसेंबर 2002 - घाटकोपर रेल्वे स्टेशनबाहेर बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी.
6 डिसेंबर 2002 - मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट. 25 जणांना जखमी करणारा हा बॉम्ब रेस्टारंटच्या एअरकंडिशनिंग सिस्टिममध्ये ठेवण्यात आला होता.
27 जानेवारी 2003 - विलेपार्ले स्टेशनबाहेर संध्याकाळी गर्दीच्या वेळी सायकल बॉम्बचा स्फोट, एका महिलेचा मृत्यू तर 30 जण जखमी.
13 मार्च 2003 - मुलुंड रेल्वेस्थानकात कर्जत लोकलमध्ये बॉम्बस्फोट. संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अत्यंत गर्दीच्या वेळी झालेल्या या स्फोटानं 11 प्रवाशांनी आपला जीव गमावला. मुंबईची जीवनवाहिनी असणा-या लोकल ट्रेनला पहिल्यांदाच लक्ष्य करण्यात आले होते.