आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरण: ना मद्यप्राशन केले ना गाडी चालवत होतो- सलमानची साक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिट अँड रन प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी अभिनेता सलमान खान आज दुपारी आपल्या लाडक्या दोन्ही बहिणींसह सेशन कोर्टात हजर झाला. सलमानसह त्याची बहिण अलविरा व अर्पिता कोर्टात आल्या. दरम्यान, दुपारी तीन नंतर सलमान खानची साक्ष झाली. यावेळी सलमान खानने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्यावर दाखल केलेला खटला चुकीचा असून आपल्याला या प्रकरणात गुंतवले जात असल्याचे मत त्याने मांडले. सलमान म्हणाला, ज्या दिवशी रात्री माझ्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी मी मद्यपान केले नव्हते. तसेच मी गाडीही चालवत नव्हतो. त्यावेळी माझा कारचालक गाडी चालवत होता. माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप खोटे आहेत अशी साक्ष सलमान खानने कोर्टासमोर दिली.
त्याआधी, सलमान खानने कोर्टात दाखल झाल्यानंतर न्यायाधिशांना एक विनंती केली. मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांमुळे निकालाआधीच आरोपी म्हणून प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे मीडियाने फक्त बातम्या द्यावा पण त्यावर मत व्यक्त करू नये असे सलमानने कोर्टाला सांगितले. सर्व मिडियाच्या लोकांना बाहेर काढावे तरच मला व्यवस्थित जबाब देता येईल असे त्याने सांगितले. मात्र, सेशन कोर्टाच्या न्यायाधिश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानची विनंती फेटाळून लावली. मिडिया आपली काहीही मते मांडू शकणार नाही. त्यामुळे याबाबत काळजी करण्याचे नाही असे कोर्टाने सलमानला सुनावले.
2002 मध्ये राजधानी मुंबईतील बांद्रा भागात सलमानने त्याच्या भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले, असा त्याच्यावर आरोप आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सलमानला आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते.
हिट अँड रन प्रकरणात न्यायालयाने आतापर्यंत 25 साक्षीदारांच्या नोंदी घेतल्या आहेत. आज फक्त बचाव पक्षाचे वकीलच नव्हे, तर न्यायाधीशही या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी सलमानची उलटतपासणी करतील, असे बचाव पक्षाचे वकील प्रदीप घरात यांनी म्हटले होते.