आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2002 Hit and run Case: Salman Khan To Be Tried For Culpable Homicide

सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार; फेरविचार याचिका फेटाळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 2002 मधील 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचे आदेश मुंबई कोर्टाने आज, सोमवारी दिले. आपल्यावरील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रद्द करण्‍याची विनंती याचिका सलमानने मुंबई कोर्टात दाखल केली होती. परंतु कोर्टाने ती याचिका फेटाळली. तसेच पुढील सुनावणीला हजार राहण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहे. सलमानवरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला 10 वर्षे कारावासाचीही शिक्षाही होऊ शकते.

दरम्यान, 28 सप्टेंबर 2002 रोजी वांद्रे येथे सलमानच्या लॅंड क्रुझर कारने अनेकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यु झाला होता तर चार जण गंभीर जखमी झाले होते. सलमान स्वत: कार चालवत होता.