आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"अपघात वार' : सोमवारी पाच वेगवेगळ्या घटनांत २२ ठार; ४६ जखमी, ३४ गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यासाठी सोमवार ‘अपघात वार’ ठरला. औरंगाबाद, जालना, ठाणे, लातूर आणि आंध्रात झालेल्या पाच अपघातांत २२ जण ठार, तर ४६ जण जखमी झाले.
मुंबई- अहमदाबाद मार्गावर आच्छाड गावाजवळ साेमवारी पहाटे मिनी बस आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात मिनी बसमधील ११ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण गंभीर जखमी झाले. मृतांपैकी दहा जण एकाच कुटुंबातील अाहेत. लक्झरी अहमदाबादहून मुंबईकडे येत होती, तर मिनी बस मुंबईहून गुजरातला जात होती.
लातूरमध्ये महिलेचा मृत्यू
लातूर । वाहनाच्या धडकेने साखरा शिवाराजवळील पेट्रोल पंपाजवळ वाहनाच्या धडकेने सुमनबाई मारुतराव देशमुख (४५) ठार झाल्या.
बारामतीचे सात युवक ठार
बारामती | तिरुपतीला निघालेल्या भाविकांचे वाहन रस्त्याच्या बाजूच्या घरावर धडकल्याने बारामतीतील ७ युवकांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील चागलामारी गावात सोमवारी पहाटे हा अपघात घडला. सागर रसाळ, अजित रसाळ, ऋषिकेश गवळी, अमित गवळी, शेखर गवळी, नागेश खराडे अशी मृतांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...