आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबई : 10 वर्षांपासून ठेवले होते खोलीत डांबून, पोलिसांनी सोडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लॅटमध्ये अशा अवस्थेत जगत होता राज. - Divya Marathi
फ्लॅटमध्ये अशा अवस्थेत जगत होता राज.
मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या काही कार्यकर्त्यांच्या मदतीने 10 वर्षांपासून एका फ्लॅटमध्ये कैद असलेल्या राज पाटील नावाच्या 22 वर्षीय तरुणाची सुटका केली आहे. बेलापूरच्या एका ड्युप्लेक्स फ्लॅटच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीत डाबंून ठेवलेल्या या तरुणाला बाहेर काढले त्यावेळी त्याची अवस्था अत्यंत गंभीर होती. सध्या त्याला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

10 वर्षांपासून आंघोळ नाही
राज याला मुंबईच्या दामिनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने सोडवले. दामिनी सेनेचे अध्यक्ष शारदा शाह यांच्यामते राजची सावत्र आई आणि भाऊ यांना राजने वेगळे राहावे अशी इच्छा होता. त्यामुळे त्याच्या वरच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले. गेल्या 10 वर्षांपासून राज खोलीतून बाहेरही आला नसून त्याने 10 वर्षे आंघोळही केली नसल्याचे समोर आले आहे. रोज पेपरमध्ये गुंडाळून त्याच्या खोलीत जेवण पाठवले जायचे. पोलिस त्याला सोडवायला गेले त्यावेळी 100 चौरस फुटांच्या खोलीत तो कपड्यांविना आढळला.

फ्लॅटमध्ये घाणच घाण
शाह यांच्यामते ज्या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये राज राहत होता, त्याच्याच खालच्या मजल्यावर त्याचे संपूर्ण कुटुंबही राहते. राजचे 9 भाऊ बहिणी असून त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. वीज पाण्याची व्यवस्था नाही. खोलीतील स्थिती तर हादरवून सोडणारी होती. फरशीवर फाटलेल्या गाद्या पेपर पडलेले होते. मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होती. बिल्डिंगच्या वॉचमननेही अनेकदा खिडकीतून घाण फेकली जात असल्याची तक्रार केली होती. शेजाऱ्यांनाही राज आत आहे, हे माहिती होते. पण त्याला सोडवण्याची हिम्मत कोणीही केली नाही. राजला बाहेर काढण्यात आले त्यावेळी त्याच्याकडे एक पाण्याची बाटली आणि दोन प्लास्टीकच्या बॅग सापल्या. एका बॅगमध्ये काही वडापाव आणि नमकीन होते.

अद्याप तक्रार नाही...
राजला बाहेर काढले त्यावेळी त्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी होती. अशक्तपणामुळे त्याला चालताही येत नव्हते. त्याला उपचारासाठी डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण राजची एवढी वाईट अवस्था असूनही अद्याप पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केलेली नाही. राजच्या नातेवाईकांचीही याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित PHOTO
बातम्या आणखी आहेत...