आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2200 Cr Drugs, Thane Police Arrested Mastermind Puneet

2200 कोटींचे एफेड्रिन ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाईंड पुनित अखेर गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मास्टरमाईंड पुनीत रमेश श्रींगी - Divya Marathi
अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मास्टरमाईंड पुनीत रमेश श्रींगी
मुंबई- सोलापूरातील चिंचोळी एमआयडीसीतील एव्हॉन ऑरगॅनिक्समधून जप्त केलेले इफेड्रीन प्रकरण आणि अहमदाबादमधील अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मास्टरमाईंड पुनीत रमेश श्रींगी (वय 46, रा. विरार, मुंबई) याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 16 एप्रिलपासून ठाणे, अहमदाबाद पोलिस त्याचा शोध घेत होते. पुनीत याला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या घटनेतील मुख्य मास्टरमाईंड पुनीतच असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. पुनीतला कोर्टाने पोलिस कोठडी दिल्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होईल अशी माहिती ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके यांनी दिली.
गुजरात एटीएसने 15 एप्रिल रोजी अहमदाबादच्या रिया इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून 270 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्याची लिंक ठाणे शहरात आणि पुढे सोलापुरात आली. सोलापुरातील एव्हॉन कंपनीत इफेड्रीन ही पावडर तयार करण्यात येत होती. त्याचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी करण्यात येत होता. पुनीत हा मागील एक वर्षापासून या कंपनीचा संचालक म्हणून काम पाहात आहे. अनेकदा तो मुंबईला जाताना आपल्या कारमधून काही टन अमली पदार्थ न्यायचा. कंपनीतील कामगार स्वामी याची त्याला साथ होती. ठाणे पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे.
ठाणे पोलिसांच्या पथकाचा सोलापूरात तळ-

ठाणे पोलिसांचे एक पथक चिंचोळी एमआयडीसीतील कंपनीत तळ ठोकून आहे. कागदपत्रांची तपासणी करणे, जबाब घेणे, पंचनामा करणे हे काम सुरूच आहे. पोलिसांनी आतापर्यंत 23 टन इफेड्रीन पावडर जप्त केली आहे. कंपनीतील कामगार धानेश्वर स्वामी, उत्पादक विभागाचा मॅनेजर राजेंद्र डिमरी (रा. दोघे सोलापूर) रायगड जिल्ह्यातील सागर पोवळे, मयूर सुखदरे या चौघांना अटक झाली असून सध्या ते पोलिस कोडठीत आहेत.
पुढे वाचा, कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल....