आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-नागपूर महामार्गावर २३ कृषी समृद्धी केंद्रे उभारणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई- नागपूर या समृद्धी महामार्गावर राज्यात २३ शहरांमध्ये शेतीवर आधारित उद्योगांसाठी कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नागपूर, औरंगाबाद अाणि नाशिक या महसुली विभागात प्रत्येकी चार तर अमरावती विभागात सर्वाधिक केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यात औरंगाबादच्या वैजापूर, दौलताबाद शेकटा येथील केंद्रांचा समावेश आहे.
मुंबई- नागपूर प्रवास तासांत पूर्ण करण्याची हमी देणाऱ्या आणि सुमारे ४६ हजार कोटींच्या या प्रकल्पात ७०२ कि.मी.चा आठपदरी महामार्ग बांधला जाणार आहे. या मार्गाच्या निमित्ताने त्या परिसराचा सामाजिक-आर्थिक विकास व्हावा, असे नियोजन सरकारने केले आहे. त्यानुसार २३ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे उभारून त्या परिसरातील शेतीशी संबंधित उद्योग उभारण्यात येणार आहेत. कृषी समृद्धी केंद्रांच्या निमित्ताने या गावांमध्ये औद्योगिक व्यापार नागरी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य मनोरंजनाच्या सुविधा, निवासी इमारती हॉटेल्स-रिसॉर्ट उभारले जाणार आहेत. एकीकडे मुंबईशी संपर्क वेगात होण्याची खात्री आणि उत्तम पायाभूत सुविधांची उपलब्धता यामुळे या गावातील परिसराचा कायापालट होणार आहे.

घोटीच्या शेतकर्‍यांना १.३० कोटींचा भूखंड
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार भूसंपादनाऐवजी भूसंकलन (लँड पूलिंग) पद्धत वापरत अाहे. ही लाभदायक पद्धत पटवून देण्यासाठी घोटी देवळीचे (जि. नाशिक) उदाहरण दिले आहे. शेतकरी आपली जमीन प्रकल्पात देऊन गुंतवणूकदार होतो आणि जमिनीची मालकीही त्याच्याकडेच राहते. घोटीजवळील देवळी गावात कोरडवाहू शेतीची किंमत एकरी अडीच ते साडेचार लाख रुपये आहे. भूसंपादन केले असते तर या जमिनीला पावणेचार पट अधिक म्हणजे एकरी १६-१७ लाख भाव मिळाला असता. लँड पुलिंगमुळे देवळीतील शेतकऱ्यांना पूर्णत: विकसित कृषी समृद्धी केंद्रात एक एकराच्या २५ टक्के म्हणजे १०,८९० चौरस फूट भूखंड मिळेल आणि त्याची किंमत किमान १.३० कोटी रुपये असेल.

नाशिक विभाग -एकूण चार गावे
>गोंदे-सिन्नर
>एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालय
> देवळी(घोटी)

नगर जिल्हा
>झगडेफाटा सावली विहिर

औरंगाबाद विभाग
>शेकटा-करमाड
>वैजापूर
> दौलताबाद-माळीवाडा

जालना जिल्हा
>जालना
बातम्या आणखी आहेत...