आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावे ते नवलच! अन् त्याच्या तोंडातून निघाले तब्बल 232 दात, पाहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- ऑपरेशननंतर आशिषच्या तोंडातील काढलेले 232 जात दाखविताना डॉक्टर सुनंदा धिवरे)
मुंबई- आपल्या तोंडात दातांची बत्तीशी असते हे आपल्याला माहित असते पण एखाद्याला 232 दात असतील असे सांगितले तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. पण होय बुलढाण्यातील एका 17 वर्षाच्या आशिष गवई नावाच्या युवकाच्या तोंडात तब्बल 232 दात आढळून आले आहेत. इतके सारे दात तोंडात असल्याने व त्याची कल्पना नसल्याने आशिषचे तोंड सुजले होते. त्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला असता ही बाब पुढे आली. मुंबईतील जेजे रूग्णालयात मंगळवारी आशिषवर जलद आणि तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आशिषच्या तोंडात आता गरजेनुसार केवळ 28 दात ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसापासून आशिषचा चेहरा व तोंड सुजू लागले होते. त्याला खाता-पिता येत होते. जेवण चावता येत नव्हते. डॉक्टराकडे दाखल झाल्यानंतर लक्षात आले की तोंडाच्या जबड्यात आणि दाढेच्या मध्ये काहीतरी वस्तू आहे व ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून त्याचे दाढ व दात दुखत होते. मात्र, उपचार करूनही हे दुखण्याचे थांबत नव्हते.
इतके दात असतील याची डॉक्टरांनाही आली नाही कल्पना- सुरुवातीला आशिष जेव्हा
डॉक्टरांकडे उपचारासाठी आला तेव्हा त्यांच्याही लक्षात ही बाब आली नाही. उपचार केल्यानंतरही दुखणे का थांबत नाही म्हणून रूग्णालयातील डेंटल विभागाच्या प्रमुख सुनंदा धिवरे यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी जेव्हा सर्जरी करण्यात आली तेव्हा तेथील उपस्थित डॉक्टरही हैरान झाले. गवईच्या सुजलेल्या दाढेतून दातांचे अनेक तुकडे बाहेर निघू लागले. डॉक्टरांनी जेव्हा हे दातांचे तुकडे मोजले तेव्हा ते 232 भरले. गवईच्या दातांच्या आतील भागात आणखी एक सुजेचा भाग आहे. त्याची सर्जरी करण्यात आली नाही. मात्र तेथेही आणखी दात निघण्याची शक्यता आहे.
अशी केस प्रथमच आढळली- रूग्णालयासाठी व तेथील डॉक्टरांसाठी अशी प्रथमच केस आढळून आली. हे ऑपरेशन सुमारे सात तास चालले. यापूर्वी अशा प्रकारची केस आली होती का ते तपासण्यात आले मात्र असे प्रथमच आढळून आले. याबाबत डेंटल विभागाच्या प्रमुख सुनंदा धिवरे म्हणाल्या की, अशा आजाराला दातांचा ट्यूमर म्हणतात. यामुळे त्रास होते मात्र जीवाला धोका नसतो. आम्हाला यापूर्वी अशी एकही केस आढळून आली नाही.
पुढे पाहा, यासंबंधातील छायाचित्रे...