आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 237 Rape Case In Mumbai Within Eight Months; Friend, Lovers Involved

मुंबईत आठ महिन्यांत 237 बलात्कार;बहुतांश प्रकरणांत मित्र, प्रियकर आणि शेजा-यांचा सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या आठ महिन्यांत मुंबई व उपनगरात 229 बलात्कार तर 8 गँगरेप झाल्याची बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. यातील बहुतांश प्रकरणांत मित्र, प्रियकर आणि शेजा-यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती मागवली होती. गँगरेपच्या एकूण आठ घटनांपैकी दोन घटना या शक्ती मिल परिसरातील आहेत, तर दिंडोशी आणि बोरिवली येथेही दोन सामूहिक बलात्कार झाले आहेत. गेल्या वर्षी मुंबईत 223 बलात्काराची प्रकरणे समोर आली होती, तर आठ सामूहिक बलात्कार झाले होते. 2011 मध्ये 211 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या, तर नऊ गँगरेप झाले होते, तर 2010 मध्ये 188 बलात्कारांच्या घटनांची नोंद पोलिसांत झाली होती.
गुन्ह्यांत प्रियकर, मित्रांचे प्रमाण अधिक बलात्कारांच्या अधिक घटनांत प्रियकर, मित्र, शेजारी आणि जवळच्या नातेवाइकांचा सहभाग असल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तरुणींनी वेळीच अशा मित्र आणि शेजा-यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून
करण्यात आले आहे.