आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 24 Giants Returned Their Awards On Thursday Over Situation In Country

निषेध : अरुंधती राॅय, कुंदन शहा, सईद मिर्झांसह 24 जणांची पुरस्कार वापसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात पुरस्कार वापसीचे लाेण दिवसेंदिवस वाढतच चालले अाहे. प्रसिद्ध लेखिका, बाॅलीवूडमधील निर्माते, दिग्दर्शक कुंदन शहा, सईद मिर्झा, वीरेंद्र सैनी अशा २४ दिग्गजांनी गुरुवारी पुरस्कार परतीची घोषणा करत माेदी सरकारच्या काळजीत अाणखीच भर टाकली अाहे.

बाॅलीवूडमधील कलाकारांनी गुरुवारी सायंकाळी मुंबई प्रेस क्लबमध्ये सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ही घाेषणा केली. यात ‘जाने भी दाे यारो’ चित्रपटाचे दिग्दर्शक कुंदन शहा, एफटीआयआयचे माजी चेअरमन सईद मिर्झा, एफटीआयआयचे माजी अिधष्ठाता वीरेंद्र सैनी, मधुश्री दत्ता, संजय काक, तपन बोस, तरुण भारतीय, अजय रैना, मंजू लोबो, रफी इलिएस, अमिताभ चक्रवर्ती अशा २४ नामवंत दिग्दर्शक, संकलक, कॅमेरामन अशा हस्तींचा समावेश आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून एफटीअायअाय, चेन्नईतील अायअायटीसह महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हस्तक्षेप वाढत अाहे. लेखकांवर हल्ले होत आहेत, खरे बोलायची भीती वाटू लागली आहे, विद्यार्थ्यांचे संप मोडण्यासाठी पोलिसी बळाचा वापर होतो आहे. हा सर्व प्रकार असहिष्णुतेच्या पलीकडे गेल्यामुळे आम्ही पुरस्कार परत करून निषेध करत आहोत, असे या कलावंतांनी सांगितले.

‘पुरस्कार परत करणे राजकीय चाल असल्याचे अभिनेते अनुपम खेर अाणि दिग्दर्शक श्याम बेनेगल म्हणतात. आम्हाला मात्र पुरस्कार वापसी निषेधाचे हत्यार वाटते असे स्पष्ट करत देशातील पुढचा काळच कोण बरोबर, कोण चूक हे ठरवेल,’ असे भाकीत कुंदन शहा यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या विरोधात मोदी राजवटीमध्ये अनेक गोष्टी होत अाहेत, असा आरोप दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी केला.

पुण्याच्या एफटीआयआयमधील आंदोलन हाताळण्यात मोदी सरकारची गंभीर चूक झाली. विद्यार्थ्यांनी आंदाेलन मागे घेतल्यानंतरही त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. विद्यार्थ्यांना पोलिसांकरवी त्रास दिला जात आहे. त्यामुळे एफटीआयआयमधला संप मिटला तरी लढाई कायम राहणार असल्याचे एफटीआयआयचे माजी अधिष्ठाता वीरेंद्र सैनी यांनी सांगितले.
पुढे वाचा, पुरस्कार वापसीवर हेमा मालिनी म्हणाल्या लोक पुरस्कारासाठी मरतात...