आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : पैशासाठी पत्‍नींकडून देहव्‍यापार करून घेणारे पती अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
ठाणे - भिवंडी येथे पोलिसांनी छापा मारून देहविक्री व्‍यवसाय करणाऱ्या चार महिलांना पकडले. दरम्‍यान, यापैकी दोन महिलांनी आपले पतीच हे घाणेरडे काम करायला लावत असल्‍याची माहिती दिली. त्‍या आधारे पोलिसांनी हनीफ खान आणि इम्तियाज शाह यांना अटक केली आहे.
कसा उघड झाला प्रकार
हनीफ खान आणि इम्तियाज शाह हे पैशांसाठी आपल्‍या पत्‍नीकडून जबरदस्‍तीने देहविक्री व्‍यवसाय करून घेत असल्‍याची माहिती महिलांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओला मिळाली. संस्‍थेने या बाबत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सापळा रचून या महिलांना ताब्‍यात घेतले. नंतर त्‍यांच्‍या नवऱ्यांना अटक करण्यात आली.

पुढील स्लाइड्सवर वाचा,
- ट्रक-कारची धडक, जुन्नरच्या डॉक्टर दाम्पत्य ठार
- दुचाकी अपघात पती-पत्नी जखमी, ठाण्यातील घटना