आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील 24 हजार बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले असले तरी हे मृत्यू केवळ कुपोषणामुळे नव्हे तर अन्य कारणानेही झाल्याचे सांगत महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी बालमृत्यू झाल्याचे बुधवारी मान्य केले.
सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी राज्यातील बालकांसाठी विविध योजना राबवल्याची माहिती दिली. राज्यात 37 टक्के वजनासह सुमारे 10 लाख 67 हजार बालके कुपोषित आढळली आहेत. त्यापैकी सव्वा लाख बालके तीव्र कुपोषित असून सुमारे 24 हजार 441 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला होता. मेळघाट, गडचिरोली जिल्हयातील देसाईगंज आणि यवतमाळमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. डहाणू तालुक्यात कुपोषणाची खोटी माहिती दिली असल्याचा आरोपही मुनगंटीवार यांनी केला. त्यावर लेखी उत्तरात गायकवाड यांनी म्हटले आहे की, आहाराच्या विविध योजना, मातृत्व अनुदान, जननी सुरक्षा योजना राज्यात सुरू आहेत. तर राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्रामअभियान राबवण्यात आले असून त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा त्यांनी केला.