आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारानंतर डॉक्टर तरुणीची हत्या; पुस्तकांच्या पानांंनी मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विले पारले- ईस्टमधील एका फ्लॅटमध्ये 25 वर्षीय डॉक्टर तरुणीचा अर्धजळीत मृतदेह सापडला आहे. श्रद्धा पांंचाळ असे मृत तरुणीचे नाव आहे. तिची हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. जिन्स पॅटने महिलेला गळा आवळून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने पुरावा नष्‍ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुस्तकाच्या पानांनी जाळण्याचाही प्रयत्न केला आहे.

सोमवारी रात्री उशीरा पार्टी करून परतली होती श्रद्धा...
- श्रद्धा विले पारले ईस्ट भागात तिच्या आईवडिलांसोबत राहात होती.
- तिच्या पालकांनी सांगितले की, ती सोमवारी रात्री एका पार्टीहून परतली होती. आईला भेटून ती आपल्या खोलीत झोपायला गेली.
- पहाटे चार वाजता शेजारच्या लोकांना श्रद्धाच्या खोलीतून धूराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसले. त्यांना तिच्या आई-वडिलांनी याबाबत माहिती दिली. सगळ्यानी तिच्या खोलीचा दरवाचा ठोठावला. पण, ती दरवाजा उघडत नसल्याचे पाहून शेजारच्या लोकांनी दरवाजा तोडला.
- खोलीत सगळीकडे धूर पसरला होता. तसेच बेडवर श्रद्धाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत तसेच अर्धजळीत अवस्थेेत पडला होता.
- मृतदेहावर अनेक जखमांचे व्रण आढले आहेत. तिच्या गळ्यावर जीन्स पॅन्ट गुंडाळलेली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, श्रद्धा चालवत होती स्वत:चे क्लिनिक... बॉयफ्रेंंडसह मैत्रिणींची पोलिसांनी केली चौकशी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...