आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराकडून सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची निर्घृण हत्या, लिव्ह इन रिलेशनमध्ये होते दोघे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण- प्रियकराकडून सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूर पश्चिम भागात घडली आहे. पूनम गजभिये (30) असे मृत तरुणीचे नाव असून विजय जारकर (25) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली मा‍हिती अशी की, पूनम ही एका खासजी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. ती मागील काही महिन्यांपासून विजयसोबत‍ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.  मात्र, दोघांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते.
मंगळवारी सात मार्चला अर्थात महिला दिनाच्या पूर्व संध्येला याच विषयावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी संतापलेल्या विजयने पूनमचा गळा आवळून हत्या केली.
बातम्या आणखी आहेत...