आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२६ सिंचन प्रकल्पांना मिळेल ‘नाबार्ड’चे कर्ज, राज्यात अाणखी साडेपाच लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंतप्रधान कृषी सिंचन याेजनेच्या माध्यमातून राज्यातील २६ मोठे-मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘नाबार्ड’कडून १२ हजार ७७३ कोटी कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात अाली.


या निर्णयामुळे राज्यातील प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊन साडेपाच लाख हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होईल. या २६ प्रकल्पांत नांदूर-मध्यमेश्वर, निम्न दुधना या प्रकल्पांचा समावेश अाहे. देशातील ९९ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने नाबार्डच्या माध्यमातून दीर्घकालीन निधी उभा करण्याचा निर्णय घेतला अाहे. या निधीच्या माध्यमातून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल. यात महाराष्ट्रातील २६ सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी २०२० पर्यंत ३ हजार ८३० कोटींचे अर्थसाह्य अपेक्षित अाहे. तसेच राज्य शासनाचा हिस्सा म्हणून नाबार्डच्या माध्यमातून १५ वर्षे मुदतीचे व सहा टक्के व्याजदराने कर्जसुविधा उपलब्ध होईल.

मराठवाडा, विदर्भाला लाभ
या योजनेत वाघूर, बावनथडी, निम्न दुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांझरा, नांदूर मधमेश्वर टप्पा-दाेन, गोसीखुर्द, ऊर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धोमबलकवडी, अर्जुना, ऊर्ध्व कुंडलिका, अरुणा, कृष्णा-कोयना ऊर्ध्व सिंचन, गडनदी, डोंगरगाव, सांगोला कालवा, खडकपूर्णा, वारणा, मोरणा इत्यादी प्रकल्प आहेत.

बातम्या आणखी आहेत...