आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाण्यात 21 वर्षीय तरूणीवर मित्राकडून चाकूहल्ला, पार्किंगमध्ये घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: सिनेवंडर मॉलमधील पार्किंगमध्ये याच ठिकाणी तरूणीवर चाकूहल्ला करण्यात आला. डोमीनोजचे कर्मचारी हल्ल्याचे ठिकाण दाखविताना)
मुंबई- ठाण्यातील मनपाडा परिसरात राहणा-या एका 21 वर्षीय तरूणीवर तिच्या मित्रानेच चाकूहल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सुजित घावत (26) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरूणी व सुजित घावत हे दोघेबी डोमीनोज पीझ्झामध्ये काम करीत होते. त्यादरम्यान दोघांत मैत्री झाली होती. काही काळानंतर सुजितने तेथील काम सोडले व एका कंपनीत रूजू झाला. त्यानंतर या दोघांत मैत्री कायम होती. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुजित तिला भेटायला सिनेवंडर मॉलच्या पार्किंगमध्ये आला होता. या मॉलमध्ये डेमीनोजचे स्टोअर्स आहे. यावेळी दोघांत काहीतरी वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात सुजितने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. किमान 10 ते 11 वार झाल्याने तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कापुरबावडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव पाटील यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...