आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Attack : Coastal Security Is Still Not Enough

26/11 ची 6 वर्षे : सागरी सुरक्षा अजूनही 'रामभरोसे'! उपाय योजनांच्या वल्गना हवेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : याच बोटद्वारे मुंबई हल्ल्यासाठी दहशतवादी मुंबईत आले होते.

मुंबई - सहा वर्षांपूर्वी समुद्रमार्गे पाकिस्तानातून मुंबईत येऊन दहशतवाद्यांनी अक्षरशः हैदोस घातला होता. पण तसे पुन्हा होणार नाही याची कोणतीही शाश्वती नाही किंवा तशा उपाययोजनाही केल्याचे आढळत नाही. समुद्रकिना-याची निगराणी एवढी कमकुवत आहे की, सहज त्याठिकाणाहून प्रवेश करता येऊ शकतो. 26 नोव्हेंबर 2008 ला पोरबंदर (गुजरात) मध्ये रजिस्‍टर्ड मछली पकडणा-या कुबेर नावाच्या बोटीत बसलेले दहशतवादी मुंबईला आले होते. आधी त्यांनी बोटीच्या पाच क्रू मेंबर्सचा जीव घेतला आणि नंतर त्या बोटच्या कॅप्टनला ठार केले. त्यानंतर मुंबईत उतरून त्यांनी 154 महिला, पुरुषं आणि लहान मुलांची हत्या केली. या घटनेनंतर किना-यावरील सुरक्षा व्यवस्था व्यवस्था आणखी कडक करण्याचे गांभीर्य लक्षात आले.
पण त्यावर अंमलबजावणी मात्र हवी तशी नाही.

नियोजनाचा भडीमार
सहा वर्षांनंतरही सागरी सुरक्षेच्या बाबतीच फारसा बदल झालेला नाही. तरीही सरकारने या काळात यासाठी 646 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. सागरी पोलिसांशी संबंधित योजनांवर 2016 पर्यंत 1571.91 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याअंतर्गत अत्‍याधुनिक इंटरसेप्‍टर बोटी घेणे, इलेक्‍ट्रॉनिक आयडेंटिफिकेशन सुविधा उपलब्ध करून देणे, आणि संपूर्ण किना-यावर पोलिस ठाणी सुरू करण्याचा विचार आहे. पण खराब डिझाइनच्या इक्विपमेंट्सबरोबर नियोजन आणि प्रशिक्षणाचा अभाव यामुळे योजना थंडबस्त्यात आहे.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या... यासंबंधीचे इतर काही मुद्दे...