आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'त्या\' भयाण रात्री सुरू झाली होती विश्वास नांगरे-पाटी यांच्या अंत्यविधीची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/मुंबई- महाराष्ट्र पोलिसातील कर्तव्यदक्ष अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचा आज वाढदिवस... ते सध्या कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी कार्यरत आहेत. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलिस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

विश्वास नांगरे-पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए. ची परीक्षा सूवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.

विश्वास नांगरे-पाटील वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्याला त्यांनी सांगितलेला किस्सा घेऊन आलो आहे. मुंबईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला हा आपल्या देशासाठी एक वाईट आठवण आहे. पण याच हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी दाखवलेले शौर्य आणि स्वतःचे प्राण धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड याचे मोल ठरवणेही शक्य नाही. दहशतवाद्यांनी हल्ला करून जेव्हा काही दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले तेव्हा त्याठिकाणी अनेक लोक होते. त्या सर्वांचे प्राण धोक्यात होते. त्यांना वाचवण्यासाठी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे कशाचीही पर्वा न करता केवळ एका बॉडीगार्डसह ताजमध्ये घुसले. त्यांनी अनेकांचे प्राणही वाचवले. त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले. त्या रात्रीची कथा विश्वास नांगरे पाटील यांनी एका वाहिनीवरील मुलाखतीत सांगितली.

पुढील स्लाइड्सवर वाचा,
- बुलेटप्रूफ जॅकेटविना केला हॉटेलमध्ये प्रवेश..
- ..तर गावामध्ये सुरू झाली होती अंत्यविधीची तयारी..
 
बातम्या आणखी आहेत...