आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 : दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी शहीद झाले वडील, आठवण आल्यावर त्यांना अशी पाहते मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद साळसकर यांची मुलगी दिव्या आजही आपल्या वडीलांची आठवण काढते. - Divya Marathi
शहीद साळसकर यांची मुलगी दिव्या आजही आपल्या वडीलांची आठवण काढते.

मुंबई- 9 वर्षांपुर्वी 26/11 रोजी मुंबईत असे काही घडले की जे कोणताही मुंबईकर विसरु शकत नाही. दहशतवाद्यांनी जवळपास 59 तास मुंबईला दहशतीत ठेवले होते. या घटनेत 164 जणांना आपले प्राण गमावावे लागले. तर 308 जण जखमी झाले. यात अनेक परदेशी नागरिकही होते. या घटनेत मुंबई पोलिस दलाचे अनेक अधिकारीही शहीद झाले. यापैकीच एक होते विजय साळसकर, ते इन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणूनही ओळखले जात होते. 

 

वडिलांची आठवण आल्यावर...
- मुंबई हल्ल्यात शहीद झालेले इन्काऊंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांची मुलगी आजही आपल्या वडिलांची आठवण काढत असते. त्यांना टीव्हीवरुन आपले वडील शहीद झाल्याची माहिती मिळाली होती.

- एचआर आणि ट्रेनिंग कन्स्लटंन्सी चालवणारी दिव्या सांगते की तिला तिच्या वडिलांची नेहमीच खूप आठवण येत असते.
- आपल्याला वडिलांची आठवण आल्यावर मी युटूयबवर त्यांचे व्हिडिओ पाहते, असे तिने सांगितले. तिला नेहमी आपले वडील आपल्याजवळ असल्यासारखे वाटते.

- शहीद साळसकर हे मुंबई पोलिस दलात महाराज म्हणून ओळखले जात. ते 26/11 च्या घटनेत कामा हॉस्पीटलजवळ दहशतवाद्याच्या गोळ्या लागल्याने शहीद झाले. 
- ते हल्ल्याच्यावेळी एका गाडीत होते. या गाडीवर कसाब आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडल्या होत्या.

 

केले होते 61 इन्काऊंटर 
- विजय साळसकर मुंबई पोलिसांच्या इन्काऊंटर स्पेशलिस्ट पथकात होते. मुंबईतील अंडरवर्ल्डवर नियंत्रण आणण्यात या पथकाची महत्वाची भूमिका होती. 

- त्यांच्या नावावर 61 इन्काऊंटरचे रेकॉर्ड आहे. साळसकर यांनी अरुण गवळीच्या टोळीला नेस्तनाबूत केल्याचे सांगण्यात येते.
- त्यांनी अमर नाईक आणि सदा पावले यांनाही अटक केली होती. एका चकमकीदरम्यान एका 18 वर्षाच्या मुलाला गोळी लागल्याने ते वादात सापडले. 

 

अरुण गवळीला घरातून उचलले होते
- अरुण गवळीने एका महिला पत्रकारास मारल्याचे सांगण्यात येते. ही बाब साळसकर यांना समजली. त्यानंतर त्यांनी थेट अरुण गवळीचे घर गाठले. त्याची गचंडी धरत त्याला त्यांनी पोलिस ठाण्यात नेले. 

- पोलिस ठाण्यात साळसकर यांनी गवळीला चांगलाच चोप दिला. या घटनेने गवळीच्या टोळीला चांगलाच धक्का बसला कारण यापूर्वी कोणताच पोलिस अधिकारी त्याच्या घरात शिरला नव्हता. 

 

15 दिवसात साळसकरांनी मारले होते गवळीचे 3 शूटर
- 1997 मध्ये केवळ 15 दिवसात गवळीचे 3 शूटर मारण्यात आले होते. गणेश शंकर भोसले, सदा पावले आणि विजय तांडेल या तिघांचा साळसकरांनी खात्मा केला होता.
- त्यानंतर साळसकरांनी गवळीचे दिलीप कुलकर्णी, नामदेव पाटील, शरद बंडेकर, बबन राघव आणि बंड्या आडीवडेकर हे शूटर मारले होते. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...