आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11: Encounter Specialist Vijay Salaskar Special Story On Divya Marathi

26/11: 61 एन्काउंटर नावावर असलेल्या या अधिका-याने डॉनची केली होती धुलाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणा-या मुंबईवरील 26/11 हल्ल्याला आज (गुरुवारी) सात वर्षे पूर्ण झाली. देशाचे हद्य समजले मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरली होती. यात 166 लोक मारले गेले होते तर 308 लोक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात अमुलाग्र बदल झाला. या हल्ल्यातील अजमल कसाब हा दहशतवादी वगळता सर्वांना भारतीय कमांडोंनी आणि पोलिसांनी ठार मारले. कसाबची रितसर सुनावणी होऊन त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आले.
हा हल्ला मुंबई शहरातील मुख्य ठिकाणी करण्यात आला होता. ताज हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 166 लोकांत 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. आज आम्ही यानिमित्ताने तुम्हाला सांगत आहोत एन्कांऊटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्याबाबत...
80 गुंडांना कंठस्नानी घातले-
मुंबई हल्ल्यात एक बहाद्दूर पोलिस अधिकारी शहीद झाले ते म्हणजे एन्कांऊटर स्पेशालिस्ट विजय साळसकर. आपल्या देशावर झालेल्या भ्याड हल्ला करणा-यांना धडा शिकविण्यासाठी ते पुढे गेले. मात्र, शत्रूएवढी त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे नव्हती. तरीही त्यांनी बहाद्दुरपणे दहशतवाद्यांशी दोन हात करीत मुकाबला केला. साळसकर यांच्यासह एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे यांच्यासह 14 पोलिस अधिकारी मारले गेले होते. साळसकर मुंबई पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षक होते. साळसकर यांनी आपल्या पोलिस दलातील कारकिर्दीत 80 गुंडांना कंठस्नानी घातले होते. यातील 61 जणांना एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. आपल्या मृत्यूच्या आधी साळसकर यांनी anty extortion cell मध्ये ईंचार्ज होते. मुंबई हल्ल्यात त्यांना आलेल्या वीरमरणामुळे शहीद साळसकर यांना मरणोत्तर 26 जानेवरी 2009 रोजी अशोक च्रकाने सम्मानित करण्यात आले.
महाराज नावाने प्रसिद्ध होत सहका-यांत-
शहीद विजय साळसकर यांना मुंबई पोलिस दलातील सहकारी महाराज नावाने ओळखले जायचे. 26/11च्या हल्ल्यात कामा हॉस्पिटलजवळ ते दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते मृत्यूमुखी पडले.
अरूण गवळीची घरी जाऊन पिटाई केली-
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, डॉन अरूण गवळीने एकदा महिला पत्रकारावर हात उचलला होता. जेव्हा ही माहिती विजय साळसकर यांना कळाली तेव्हा त्यांनी चार पोलिस कर्मचा-यांना सोबत घेतले व तडक धारावी गाठली. अरूण गवळीच्या घरात घुसून त्याला बाहेर खेचले व पोलिस गाडीत बसवून ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात गवळीला आणताच त्याची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे गवळीची गॅंग टरकली होती. त्याआधी गवळीच्या घरात घुसण्याची कोणाही पोलिस अधिका-याने हिंमत दाखवली नव्हती.
गवळीचे साम्राज्य नष्ट केले-
26/11 मुंबई हल्‍ल्‍यात शहीद झालेले एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांनी डॉन अरुण गवळी याच्‍या गँगचा सफाया केला होता. त्‍यांनी गँगस्टर अमर नाईक आणि सदा पावले यांना अटक केली होती. त्‍यामुळे ते चर्चेत आले होते. पुढे 1997 मध्ये 15 दिवसातच गवळीचे टॉपचे तीन शूटर्स गणेश शंकर भोसले, सदा पावले व विजय तांडेल यांना एनकाउंटरमध्ये मारले होते. त्यानंतर गवळीचे साम्राज्य नष्ट करताना दिलीप कुलकर्णी, नामदेव पाटील, शरद बंडेकर, बबन राघव, बंड्या आडीवडेकर यांना एनकाउंटरमध्ये मारले. दरम्‍यान, एक एनकाउंटर करताना एका 18 वर्षीय मुलाला गोळी लागून त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे ते वादात अडकले होते. माजी पोलिस आयुक्‍त राकेश मारिया यांच्‍या ते सर्वात आवडीचे अधिकारी होते.
पुढे पाहा, विजय साळसकर यांची निवडक छायाचित्रे...