आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६/११ हल्ल्यामागचा सूत्रधार सर्वांनाच माहीत : सैफ अली खान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फँटम या आगामी चित्रपटाला पाकिस्तानात बंदी घालण्यात आल्यानंतर अभिनेता सैफ अली खानने त्यावर सडकून टीका केली आहे. फँटम हा मुंबईतील २६/११ हल्ल्याच्या तथ्यांवर आधारित चित्रपट आहे आणि या हल्ल्यामागे हाफिज सईदचा हात होता हे सर्वांनाच माहीत आहे.
त्यामुळे साहजिकच या चित्रपटावर पाकमध्ये बंदीची मागणी तसेच विरोध होणार, हे आम्हाला माहिती होते, असे सैफने सांगितले आहे. जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पाकिस्तानच्या न्यायालयात मागच्या आठवड्यात फँटमवर बंदी घालण्याबाबतची याचिका दाखल केली होती. एखाद्या देशात गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस अशाप्रकारची न्यायालयीन मागणी करत असेल, तर ती त्या देशासाठी अत्यंत शरमेची बाब आहे, असेही सैफने म्हटले आहे.