आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर टाळता आला असता 26/11 चा हल्ला, भारतासह अमेरिका, इंग्लंडकडे होती माहिती!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2008 मध्ये झरार शाह नावाचा एक कॉम्प्युटर एक्सपर्ट पाकिस्तानातील एका सुरक्षित ठिकाणी बसून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ल्याचा कट रचत होता. - Divya Marathi
2008 मध्ये झरार शाह नावाचा एक कॉम्प्युटर एक्सपर्ट पाकिस्तानातील एका सुरक्षित ठिकाणी बसून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ल्याचा कट रचत होता.

मुंबई- मुंबईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच त्यासंबंधीच्या काही टिप्स भारतासह अमेरिका आणि इंग्लंडसारख्या बड्या देशांना मिळाल्या होत्या. पण तरीही हा हल्ला रोखण्यात यश आले नसल्याची माहिती नुकतीच उघड झाली आहे. हल्ला होणार असल्याबाबत तिन्ही देशांकडे माहिती होती. पण एकमेकांबरोबर ही माहिती शेअर केली नसल्यामुळे कट उघड होऊ शकला नाही, असे समोर आले होते.

 

2008 मध्ये झरार शाह नावाचा एक कॉम्प्युटर एक्सपर्ट पाकिस्तानातील एका सुरक्षित ठिकाणी बसून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ल्याचा कट रचत होता. लश्कर ए तोयबाचा तंत्रज्ञान प्रमुख असलेल्या शाह आणि कारस्थान रचणा-या इतरांनी हल्ला करणा-या दहशतवाद्यांना मार्ग आणि हल्ल्याची ठिकाणे दाखवण्यासाठी गूगल अर्थचा वापर केला होता. पत्ता लागू नये म्हणून माहिती देण्यासाठी इंटरनेट फोन सिस्टीमचा वापर करत फोन न्यू जर्सीहून होत असल्याचे भासवले. हल्ल्याच्या काही कालावधीपूर्वी पूर्वीच शाह याने इंटरनेटनवर ज्युविश हॉस्टेल आणि दोन मोठ्या हॉटेल्सबद्दल माहिती शोधली होती. ही सर्व हल्ला झालेली ठिकाणे होती.

 

हे सर्व करत असतानाच सप्टेंबर महिन्यात ब्रिटीश गुप्तचर संस्थांची नजर त्याच्या अनेक ऑनलाईन हालचालींवर होती. ते शाहचे इंटरनेट सर्चेस आणि संदेश ट्रॅक करत होते. अमेरिका आणि भारताच्या माजी अधिका-यांनी दिलेली माहिती आणी एडवर्ड स्नोडेन यांनी ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणए भारतीय गुप्तचर संस्थांनीही त्याला ट्रॅक केले होते. हल्ल्यानंतर देण्यात आलेल्या माहितीमध्ये हे उघड झाले होते. पण या दोन संस्थांना माहिती असल्याचे अमेरिकेला माहिती नव्हते. तरीही हल्ला होणार अशी माहिती मिळाल्यानंतर भारताला सूचना देण्यात आल्याचे अमेरिकेच्या तत्कालीन अधिका-यांनी म्हटले होते.

 

यानंतर काय झाले ते संपूर्ण जगानेच पाहिले. या हल्ल्यासंदर्भात तिनही देशांना जी काही माहिती किंवा टिप्स मिळाल्या होत्या त्याचा जर एकत्रितपणे अभ्यास केला असता तर हा हल्ला टाळता आला असता असे मत नंतर जगभरातील गुप्तचर अधिका-यांचे बनले.

 

हल्ला सुरू झाल्यानंतर या तीन देशांनी शेअर केली माहिती-

 

या संदर्भात असलेली माहिती कोणत्याही देशाने एकमेकाबरोबर शेअर केली नसल्याचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री शिवशंकर मेनन यांनी म्हटले होते. हेच मेनन नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही बनले होते. अमेरिका, इंग्लंड किंवा भारत कोणीही आपल्याकडे असलेले माहिती दुस-याला सांगितली नाही. जेव्हा हल्ला सुरू झाला त्यानंतर या सर्वांनी एकमेकांना ही माहिती शेअर केली होती. त्यानंतर लगेचच संपूर्ण हल्ल्याचे चित्र स्पष्ट झाले असे मेनन यांनी म्हटले होते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती...

बातम्या आणखी आहेत...