आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Mumbai Attacks : David Headley Depose Before Mumbai Court

पत्नीसह हॉटेल ताजमध्ये थांबला होता हेडली, 26/11 च्या हल्ल्यासाठी ISI ने पुरवला पैसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 26/11 हल्लाचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीची दुस-या दिवशीही साक्ष नोंदवली जात आहे. अमेरिकेतील तुरूंगात शिक्षा भोगणार्‍या हेडलीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईच्या विशेष कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे.

दुसर्‍या दिवशीही हेडलीने धक्कादायक खुलासे केले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI साठी भारतीय लष्करात हेरगिरी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आल्याचे हेडलीने सांगितले. हेडली 2006 मध्ये पहिल्यांदा भारतात आला होता. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये तो थांबला होता. त्यानंतर 2007 मध्ये तो पुन्हा भारतात आला होता. यावेळी त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत होती. पत्नीसोबत तो हॉटेल ताजच्या सेकेंड फ्लोअरवर थांबला होता. यावेळी त्यानी ताजसह मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची पाहाणी केली होती. तसेच काही ठिकाणांचा त्याने व्हिडीओ बनवला होता.

काय म्हणाले विशेष सरकारी वकील?
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले, की मुंबईत 26/11 चा हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने लष्कर-ए-तोयबाला पैसा पुरवल्याचे डेव्हिड हेडलीने कबुल केले. इतकेच नव्हे तर दहशतवादी संघटनेचे आयएसआयबरोबर निकटचे संबंध असल्याचे हेडलीने चौकशीत सांगितले.

बुधवारीही हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्यात येणार आहे. यात पाकिस्तानचा आणखी कोणता चेहरा समोर येतो हे पाहाणे, महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वाचा, दुसर्‍या दिवशी हेडलीने कोणते केले खुलासे...?
- हेडलीने 14 सप्टेंबरला 2006 रोजी मुंबईत स्वत:चे ऑफिस सुरु केले होते.
- हेडली 14 सप्टेंबर 2006 ला हॉटेल ताजमध्ये थांबला होता. 28 सप्टेंबरपर्यंत तो तिथेच होता.
- मुंबईत त्याच्या थांबण्याची सर्व व्यवस्था बशीर शेख याने केली होती.
- हेडली म्हणाला, "डॉ.राणा यांनी मुंबईत त्याला अॉफिस सुरु करण्‍याची परवानगी दिली होती.'
- मुंबईलाच का टार्गेट केले?, उज्ज्वल निकम यांच्या या प्रश्नावर तो काहीच बोलला नाही. कारण माहीत नसल्याचे हेडलीने नंतर सांगितले.
- हॉटेल ताजमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये लक्ष्य करण्यामागे 'लॉजिस्टिक रीझन' असल्याचे हेडलीने सांगितले.
- मुंबईवर हल्ला करण्‍यासाठी लष्कर-ए-तोयबा माझ्याकडून हे सर्व काही करून घेत असल्याचे तेव्हा माहीत नसल्याचे हेडलीने सांगितले.
- हेडलीने मेजर अब्दुल रेहमान पाशाचा फोटो ओळखला. पाशा हा पाकिस्तानी लष्कराचा माजी मेजर आहे.
- 2003 मध्ये लाहोर येथील एका मशिदीत अब्दुल रेहमान पाशाला हेडली पहिल्यांचा भेटला होता.
- 2006 मध्ये हेडली पहिल्यांदा मेजर इकबालला लाहोर येथे भेटला होता. यावेळी पाकिस्तान लष्करातील एक कर्नल उपस्थित होता.
- पत्नीमुळे अटक झाल्याने हेडलीने सांगितले. लष्कर-ए-तोयबासाठी काम करत असल्याचे तिला कळले होते. जानेवारी 2008 मध्ये तिने पाकिस्तानच्या यूएस दुतावासाकडे तक्रारी दिली होती.
-2003 मध्ये एलईटीशी संबंधित लोकांसाठी एक गॅदरिंग झाले होते. यात मौलाना मसूद अझहर गेस्ट स्पीकर होता.
- हेडलीने सांगितले, की जकी उर रेहमान लख्वी लष्क-ए -तोयबाचा ऑपरेशन कमांडर होता.
- 2006 मध्ये साजिद मीर, अबु काफा, मुजामिलसोबत एक बैठक झाली होती.
- इंडियन डिफेन्स सायंटिस्टची एक मीटिंग हॉटेलच्या कॉन्फ्ररन्स हॉलमध्ये होणार होती. सायंटिस्टला लक्ष्य करण्‍याचा कट होता. - हेडलीने मुंबईतील कुलाब्यातील भगत सिंग मार्ग, लिओपोल्ड कॅफे, कुलाबा पोलिस स्टेशनसह त्या मार्गावरील अनेक दुकाने व रेस्तरॉचेही व्हिडीओ शूटिंग केले होते.
- मुंबईची रेकी करताना साजिद मीरने सिद्धीविनायक मंदिराची पाहणी करण्याची विशेष सूचना केली होती.
-ताज हॉटेलशिवाय ओबेरॉय हॉटेल, मुंबई पोलिस मुख्यालय तसेच नौदल व वायुदलाचीही रेकी केल्याचे हेडलीने सांगितले. ही सर्व ठिकाणे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती.
- हेडलीने पाठवलेला ताज हॉटेलचा व्हिडीओ व फोटो पाहून साजीद मीर व मेजर इक्बाल समाधानी होते, असेही हेडली म्हणाला.
- 'लष्कर-ए-तोयबा'वर अमेरिकेने घातलेल्या बंदीला कायदेशीर आव्हान देण्याचा मी निर्धार केला होता. याविषयी हाफीझ सईद व झकी-उर-रेहमान-लख्वी यांच्याशी चर्चा केली होती.
- हेडली हाफिज सईद व लख्वी यांच्या उपस्थितीत 102 दहशतवाद्यांसोबत हेडलीने दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले होते.
- 'लष्कर-ए-तोयबा'ने मुंबईवर हल्ला करण्याचा निर्णय 2007 साली घेतला.
- नोव्हेंबर - डिसेंबर 2007 मध्ये साजिद मीर साजिद, अबु खफा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हेडलीकडे मुंबईतील ताजमहल हॉटेलची रेकी करण्याचे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये जन्मलेला अमेरिकी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईच्या विशेष करण्यात आले होते. परदेशी भूमीतून एखाद्या गुन्हेगाराने व्हिडिओ लिंकद्वारे भारतीय कोर्टात हजर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी मुंबईवर दोनवेळा हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, दोन्ही वेळा हल्ल्यांचा प्रयत्न फसल्याचे त्याने विशेष कोर्टाला सांगितले.

शिकागोतील तुरुंगातून दिलेल्या साक्षीत हेडली म्हणाला की, लष्करचा हँडलर (आणि 26/11 हल्ल्याचा आरोपी) साजीद मीरने मला माहिती दिली होती. तत्पूर्वी मुंबईवर हल्ल्याचे दोन प्रयत्न फसले होते. सप्टेंबर 2008 मध्ये कराचीहून निघालेली एक बोट समुद्रातील खडकावर आदळून फुटली होती. त्यामुळे लाइफ जॅकेट घालून दहशतवादी परत पाकिस्तानी किनाऱ्यावर आले होते. ऑक्टोबर 2008 मध्ये दुसरा प्रयत्न झाला होता. तोही फसला. तिसऱ्या वेळेला 10 दहशतवादी मुंबईवर हल्ला करण्यात यशस्वी ठरले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या आरोपात हेडलीला अमेरिकेत ३५ वर्षांची शिक्षा झाली आहे. सकाळी सात वाजता त्याला विशेष न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्यासमोर हजर करण्यात आले. साडे पाच तास चाललेल्या साक्षीत हेडलीने मुंबईवरील हल्ल्याची तपशीलवार माहिती दिली. हल्ल्याचा कट रचण्यापासून ते या हल्ल्यात सहभागी लष्कर - ए- तोएबाचे नेते आणि आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी निभावलेली भूमकाही सांगितली. मंगळवारीही हेडलीची साक्ष नोंदवली जाणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, हेडलीचा कबुलनामा