आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Mumbai Attacks: David Headley Investigation Depose Before Court

पाकचा \'नापाक\' चेहरा समोर करणार्‍या हेडलीची साक्ष तांत्रिक अडचणीमुळे तहकूब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'लष्कर-ए-तोयबा', 'जैश-ए-मोहंमद' आदी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयकडून (ISI) पैसा व लष्करी रसद पुरवली जात असल्याचा गौप्यस्फोट करणार्‍या डेव्हिड कोलमन हेडलीची आज (बुधवार) साक्ष तहकूब करण्‍यात आली. तांत्रिक अडचणी आल्यामुळे हेडलीची साक्ष होऊ शकली नसल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याची आज (बुधवार) सलग तिसर्‍या दिवशी होणारी साक्ष तहकूब करण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळे हेडलीची साक्ष होऊ शकली नाही.

हेडलीच्या तिसर्‍या दिवसाच्या साक्षच्या काही हायलाइट्‍स...
- व्हिडिओ कॉन्फ्रेंसिगची लिंक फेल झाल्यामुळे हेडलीची बुधवारीची साक्ष नोंदवता आली नाही.
- गुरुवारी सकाळी 7 ते दुपारी 1:30 वाजेदरम्यान साक्ष नोंदवली जाईल.
- उज्ज्वल निकम यांनी सांगितले, की व्हिडिओ कॉन्फ्रेंसिगची लिंक कनेक्ट न झाल्यामुळे हेडलीची साक्ष कोर्टाने उद्यापर्यंत तहकूब केली आहे. व्हिडिओ लिंक कनेक्ट करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

दरम्यान, अमेरिकेतील तुरुंगात असलेल्या हेडलीने सोमवार व मंगळवारी दिलेल्या साक्षीत पाकिस्तानचा पर्दाफाश केला. दहशतवादी कारवायांना पाकिस्तान खतपाणी घालत असल्याचेही हेडलीने सांगितले.

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा हेडलीवर आरोप आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोर हा जबाब नोंदवला जात आहे. आयएसआयसोबत राहूनच आपण लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होतो, अशी कबुली हेडलीने दिली. यामुळे पाकिस्तानी लष्करातील अनेक अधिकाऱ्यांच्या आपल्या भेटी झाल्याचेही त्याने नमूद केले.

दरम्यान, हेडलीच्या जबाबानंतर मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडला कठोर शिक्षा ठोठावण्याच्या कामी भारताला संपूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जॉन किर्वी म्हणाले.

शास्त्रज्ञ परिषद, सिद्धिविनायक मंदिर उडवण्याचा कट
ब्रिगेडियर रियाज अतिरेक्यांचा हस्तक
आयएसआयमध्ये कार्यरत असलेला ब्रिगेडियर रियाज याचे थेट अतिरेक्यांशी संबंध होते. तोयबाचा कमांडर व झकी-उर-रहेमान याचा तो हस्तक होता, असेही हेडलीने जबाबात म्हटले आहे. बुधवारीही त्याचा हा जवाब नोंदवला जाणार आहे.

उज्ज्वल निकम विचारत होते प्रश्न
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व्हीसीद्वारे हेडलीला प्रश्न विचारत होते. निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार हेडलीने कुलाब्यात भगतसिंग मार्गाचा व्हिडिओ तयार केला होता. या मार्गावरील लिओपोल्ड हॉटेल, पोलिस ठाणे व अन्य हॉटेल यात स्पष्ट दिसत होते.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोणते गौप्यस्फोट केले