आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11: या वीरांचे बलिदान कायमच प्रेरणा देईल आपल्याला, वाचा शूरतेची गाथा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज संपूर्ण देश या वीरांना आदरांजली वाहत आहे. - Divya Marathi
आज संपूर्ण देश या वीरांना आदरांजली वाहत आहे.

मुंबई- मुंबईवरील हल्ल्याला आज (रविवारी) नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरून गेली होती. यात 166 लोक मारले गेले तर 308 लोक जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता. मुंबईचे वैभव समजल्या जाणा-या ताज हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करण्यात आले.

 

या हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. आपल्या देशावर झालेल्या भ्याड हल्ला करणा-यांना धडा शिकविण्यासाठी ते पुढे सरसावले होते. मात्र, त्यांच्याकडे शत्रूएवढी आधुनिक शस्त्रे नव्हती. तरीही त्यांनी बहाद्दुरपणे दहशतवाद्यांशी दोन हात करीत मुकाबला केला. यात एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे, एनकाऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, मेजर उन्नीकृष्णन यांच्यासह 14 पोलिस अधिकारी-कर्मचारी मारले गेले होते.

 

आपल्या देशाचे व आपल्या सर्वांचे रक्षण करताना शहीद झालेल्या या बहाद्दूर हिरोंना आज आदरांजली वाहूया...

 

हेमंत करकरे-

 

हेमंत करकरे यांचा जन्म 1954 साली झाला होता. ते 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. नागपूरमधील विश्वेश्वर रीजनल इंजिनियरिंग कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. हल्ल्याच्या वेळी ते मुंबई एटीएसचे प्रमुख होते. त्याआधी त्यांनी चंद्रपूर येथील नक्षली प्रभाव असलेल्या परिसरात काम केले होते. डॉ. के पी रघुवंशी यांच्याकडून मुंबई एटीएसचा पदभार स्वीकारण्यापूर्वी नॉरकोटिक्स विभागात काम करीत असताना त्यांनी एका परदेशी ड्रग माफियाला गिरगाव चौपाटीवर ठार मारले होते. ते रिसर्च एंड एनालिसिस विंग (रॉ) साठी सात वर्षे ऑस्ट्रियात सेवा देऊन महाराष्ट्र केडरमध्ये दाखल झाले होते. तेथून परताच जानेवारीमध्ये त्यांना एटीएसचे प्रमुख बनवले गेले होते.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, आणखी कोणत्या बहाद्दूर अधिका-यांनी कसा दिला होता लढा...

बातम्या आणखी आहेत...