आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11: मुलगी, पतीच्या मृत्यूनंतर या महिलेने कसाबला लिहिले पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किया स्चेयर अमेरिकेत राहते. - Divya Marathi
किया स्चेयर अमेरिकेत राहते.

मुंबई- मुंबईवरील हल्ल्याला आज 9 वर्ष झाली आहेत. यानिमित्ताने आम्ही या हल्ल्यात आपला पती आणि मुलगी गमावणाऱ्या एका अमेरिकन महिलेविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या महिलेने कसाबला पत्र लिहिले होते. 

 

असा झाला मुलीचा आणि पतीचा मृत्यू 
- आपल्या परिवारातील सगळ्यात महत्वपूर्ण सदस्यांना गमावलेल्या किया स्चेयर या अमेरिकेत राहतात आणि मुंबई हल्ल्यानंतरही नेहमी भारतात येत असतात.

- 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या या हल्ल्यात स्चेयरने आपले पती एलन आणि मुलगी नाओमी यांना गमावले.
- एलनच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर 13 वर्षाच्या नाओमीला अनेक गोळ्या लागल्या आणि तिने काही वेळाने प्राण सोडले. 

- मागील काही वर्षात कियाने मुंबईला अनेक वेळा भेट दिली. कसाबला देण्यात आलेली फाशी योग्यच असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. 
- किया पुढे म्हणाली की, जगात शांतता नांदावी हीच माझी इच्छा आहे. न्याय तेव्हाच मिळू शकतो जेव्हा शांतता आणि स्नेह असेल. मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशी दिल्याने अनेकांना न्याय मिळाल्याची माझी भावना आहे. 

 

काय लिहिले होते पत्रात
- कियाने मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद असताना कसाबला एक पत्र लिहिले होते त्यात तिने लिहिले की, पती आणि मुलीच्या मृत्यूने माझे जीवन संपले आहे. माझे कुटूंब राहिले नाही. माझा एक हिस्सा त्यांच्यासोबतच निघून गेला. 

- कसाब तुझे जीवनही मुंबई हल्ल्यात संपले आहे. तु जीवंत असला तरी तुला माहिती आहे की तुझे जीवन संपले आहे

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...